शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आला झोलो इरा वन एक्स प्रो !

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 19:41 IST

झोलो कंपनीने आपला किफायतशीर दरातला आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा इरा वन एक्स प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

झोलो कंपनीने आपला किफायतशीर दरातला आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा इरा वन एक्स प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

झोलो कंपनीने आजवर बहुतांश एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. इरा वन एक्स प्रो हे मॉडेलदेखील याला अपवाद नाही. अर्थात या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असल्याने रिलायन्स जिओसह अन्य व्हिओएलटीई सेवांचा वापर करणेदेखील शक्य आहे. फिचर्सचा विचार करता यात  पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात १.५ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर असून याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असेल. मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्याने हे स्टोअरेज ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ६.० म्हणजेच मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेर्‍यात ड्युअल एलईडी फ्लॅश असून त्याची क्षमता ५ मेगापिक्सल्सची असेल. मुख्य कॅमेर्‍यामध्ये स्लो-मोशन व्हिडीओ, लाईव्ह फोटो, टाईम लॅप्स व्हिडीओ, ऑडिओ नोटस्, ब्युटी मोड, बर्स्ट मोड आदी विशेष फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेर्‍याच्या मदतीने उत्तम दर्जाचे सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंग करता येईल. या मॉडेलमध्ये अँबियंट लाईट सेन्सर, प्रॉक्झीमिटी सेन्सर आणि अ‍ॅक्सलेरोमीटरचा समावेश करण्यात आला आहे. तर यात २५०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची लिथियम पॉलिमर बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल एक दिवसापर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले हे मॉडेल स्नॅपडील या शॉपिंग पोर्टलवरून ग्राहकांना ५,८८८ रूपये मुल्यात खरेदी करता येणार आहे.