शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नोकियाचा नवीन किफायतशीर 5G Phone सादर; जाणून घ्या Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स

By सिद्धेश जाधव | Updated: September 23, 2021 11:48 IST

Affordable 5G Phone Nokia G50 price: Nokia G50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे. या फोनला कंपनी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे.

ठळक मुद्देNokia G50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे. हा फोन लवकरच भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Nokia ने एका टीजर इमेजमधून 6 ऑक्टोबरच्या ग्लोबल इव्हेंटची माहिती दिली होती. या इव्हेंटमधून इतर डिव्हाइसेससह Nokia G50 5G Phone देखील लाँच केला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्याआधीच कंपनीने आपला हा नवीन स्मार्टफोन Nokia G50 5G अधिकृतपणे सादर केला आहे. चला जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.  

Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Nokia G50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे. अँड्रॉइड 11 ओएससह बाजारात आलेल्या या फोनला कंपनी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB व 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येईल.  

हा 5G फोन कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm हेडफोन जॅक सोबतच 4G VoLTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C पोर्टला सपोर्ट करतो. तसेच या फोनची सिक्योरिटी फेस अनलॉक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरवर अवलंबून आहे. Nokia G50 5G मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी सेगमेंट पाहता, नोकिया जी50 5जी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनमधील 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा इलेक्ट्रोनिक ईमेज स्टेबलाइजेशन (EIS) फीचरसह येतो. नोकिया जी50 5जी फोनमध्ये 720 × 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.82-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Nokia G50 5G Phone ची किंमत 

  • Nokia G50 5G (4GB+64GB): 259 युरो (अंदाजे 22,300 रुपये) 
  • Nokia G50 5G (4GB+128GB): 279 युरो (अंदाजे 24,100 रुपये) 

हा फोन लवकरच भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड