शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एसरचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट

By शेखर पाटील | Updated: December 11, 2017 22:35 IST

एसरने विंडोज प्रणालीसाठी आपला पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केला असून, यात आभासी आणि विस्तारीत म्हणजे व्हर्च्युअल आणि ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीतील अनुभूती घेता येणार आहे.

एसरने विंडोज प्रणालीसाठी आपला पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केला असून, यात आभासी आणि विस्तारीत म्हणजे व्हर्च्युअल आणि ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीतील अनुभूती घेता येणार आहे. सध्या व्हर्च्युअल तसेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीची मिश्र अनुभुती घेण्यासाठी काही हेडसेट बाजारपेठेत दाखल झाले आहेत. यात डेल, असुस, एचपी, मायक्रोसॉफ्ट, लेनोव्हो आदी कंपन्यांचे हेडसेट उपलब्ध आहेत. आता यात एसर कंपनीच्या मॉडेलची भर पडली आहे. याचे नाव ‘एसर विंडोज मिक्स्ड रिअ‍ॅलिटी’ असे असेल. कंपनीने बंगळुरू शहरातील आपल्या ‘प्रिडेटर लीग इव्हेंट’मध्ये याची घोषणा केली. यात वैश्‍विक पातळीवर मान्यताप्राप्त असणार्‍या ‘६ डिग्रीज ऑफ फ्रिडम’ (६डीओएफ) या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. तसेच याच्यासोबत १३ फूट लांबीची वायर देण्यात आली असून यामुळे युजरला मोकळेपणाने याचा वापर करता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे.‘एसर विंडोज मिक्स्ड रिअ‍ॅलिटी’ या हेडफोन मॉडेलमध्ये दोन्ही डोळ्यांसाठी प्रत्येकी ९५ अंशातील व्ह्यू असणारा, २.८९ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजरला २८८० बाय १४४० पिक्सल्स म्हणजेच अल्ट्रा हाय डेफिनेशनची अनुभुती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हा हेडसेट परिधान करताना युजरला आरामदायी वाटेल याची काळजी घेण्यात आली आहे. अर्थात तो वजनाने हलका आणि वापरण्यासाठी सुलभ असाच आहे. एचडीएमआय २.०च्या मदतीने हा हेडसेट संगणकाला कनेक्ट करणे शक्य आहे. या हेडसेटचे मूल्य आणि याच्या उपलब्धतेबाबत मात्र सध्या तरी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, सध्या हे मॉडेल अमेरिकेत ३९९ डॉलर्सला मिळत आहे. याचा विचार करता हा हेडसेट १५ हजारांपेक्षा जास्त मूल्यात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान