शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

Windows 11 सपोर्टसह Acer चे 6 नवीन लॅपटॉप भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: October 07, 2021 7:15 PM

Windows 11 Acer Laptop: Acer ने भारतात 6 नवीन लॅपटॉप सादर केले आहेत, जे लेटेस्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रीलोडेड Office 2021 सह उपलब्ध होतील.  

Acer ने आपल्या लॅपटॉप पोर्टफोलियोचा विस्तार करत Windows 11 आधारित 6 नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. यात Acer Swift X, Swift 3, Aspire 3, Aspire 5, Spin 3 आणि Spin 5 चा समावेश आहे. भारतात येणाऱ्या या सहा लॅपटॉपची किंमत 55,999 रुपयांपासून सुरु होत आहे. हे लॅपटॉप नव्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रीलोडेड Office 2021 सह विकत घेता येतील. हे नवीन लॅपटॉप Acer online store, Amazon आणि Flipkart सह Acer exclusive stores, Croma, Reliance आणि Vijay Sales अशा ऑफलाईन स्टोर्समधून विकत घेता येतील.  

Acer Swift X (SFX14-41G) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

Acer Swift X (SFX14-41G) मध्ये 14-इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले मिळतो. जो 100 टक्के sRGB कलर गमुट आणि 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात hexa-core AMD Ryzen 5 5600U प्रोसेसर आणि Nvidia RTX 3050 जीपीयू मिळतो . त्याचबरोबर 4GB ग्राफिक्स मेमरी आणि AMD Radeon ग्राफिक्स मिळतात. कंपनीने यात 16GB पर्यंतचा रॅम आणि 512GB SSD स्टोरेज दिली आहे. 59Whr बॅटरीसह येणाऱ्या Acer Swift X (SFX14-41G) ची किंमत भारतात 86,999 रुपये आहे. 

Acer Swift 3 (SF314-43), Swift 3 (SF314-511) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

Acer Swift 3 (SF314-43) आणि Swift 3 (SF314-511) दोन्ही मॉडेल्समध्ये 14-इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 85 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Acer Swift 3 (SF314-43) लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5000U प्रोसेसर आणि Acer Swift 3 (SF314-511) मध्ये 11 जनरेशन इंटेल कोर आय5 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे लॅपटॉप 16GB पर्यंतच्या रॅम व 1TB SSD स्टोरेजसह विकत घेता येतील. Acer Swift 3 (SF314-43) आणि Swift 3 (SF314-511) ची किंमत 62,999 रुपये आहे. 

Acer Aspire 3 (A315-58) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

Acer Aspire 3 (A315-58) मध्ये 15.6-इंचाचा फुल एचडी टीएफटी डिस्प्ले मिळतो. यात Intel Core i5-1135G7 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा लॅपटॉप SSD आणि HDD स्टोरेजसह येतो. यात फुल-लेंथ कीबोर्ड देखील मिळतो. यात तुम्हाला फिंगरप्रिंट रीडर आणि विंडोज हॅलो सपोर्ट मिळेल. Acer Aspire 3 (A315-58) ची किंमत 55,999 रुपयांपासून सुरु होते.  

Acer Aspire 5 (A514-54) आणि Aspire 5 (A515-56-5) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

Acer Aspire 5 (A514-54) मध्ये 14-इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले मिळतो, तर Acer Aspire 5 (A515-56-5) मध्ये 15.6-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळतो. दोन्ही लॅपटॉपमध्ये 11 जनरेशन Intel Core i5-1135G7 प्रोसेसर आहे, त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 1 टीबी पर्यंतची M.2 PCIe SSD स्टोरेज मिळते. Aspire 5 ची प्रारंभिक किंमत 57,999 रुपये आहे.  

Acer Spin 3 (2021) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

Acer Spin 3 (2021) मध्ये 13.3-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा टच स्क्रीन डिस्प्ले Wacom AES 1.0 आणि Acer Active Stylus ला सपोर्ट करतो. हा लॅपटॉप 11 जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर आणि Intel Iris Xe ग्राफिक्ससह बाजारात आला आहे. Spin 3 (2021) मध्ये सिंगल चार्जवर 15 तास वापरता येतो. Acer Spin 3 (2021) ची किंमत 74,999 रुपये आहे. 

Acer Spin 5 (2021) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

Acer Spin 5 (2021) मध्ये 3:2 अस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा लॅपटॉप 11 जनरेशन इंटेल कोर आय7 प्रोसेसर आणि Intel Iris Xe ग्राफिक्ससह बाजारात आला आहे. यात कंपनीने 16GB LPDDR4X रॅम दिला आहे. लॅपटॉपमध्ये 1TB PCIe Gen 4 SSD पर्यंतची स्टोरेज मिळते. सिंगल चार्जवर 15 तासांचा बॅटरी बॅकअप देणारा हा लॅपटॉप 99,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :acerएसरtechnologyतंत्रज्ञान