शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आणखीन काय हवं? कमी किंमत, 6000mAh बॅटरी, 6GB RAM आणि मोफत Earbuds सह येतोय फोन 

By सिद्धेश जाधव | Updated: December 28, 2021 16:33 IST

Budget Phone Tecno Pova Neo: Tecno Pova Neo च्या खरेदीवर 1499 रुपयांचे इयरबड्स मोफत देण्यात येतील. हा फोन 6,000mAh battery आणि 6GB RAM सह बाजारात येईल.

Tecno Mobile नं कालच आपला सर्वात पहिला 5G Phone सादर केला आहे. फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत Tecno Pova 5G निराश करत नाही. हा फोन कंपनीनं जागतिक बाजारात सादर केला आहे. परंतु भारतीय ग्राहकांसाठी देखील कंपनी दोन फोन सादर करणार आहे. यातील Spark 8 Pro अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. तर Tecno Pova Neo च्या भारतीय लाँचची माहिती लीक झाली आहे.  

Tecno Pova Neo च्या भारतीय लाँचचा एक पोस्टर ऑनलाईन लीक झाला आहे. या पोस्टरमध्ये फोनच्या स्पेक्स आणि ऑफर्सचा उल्लेख करण्यात आला आहे. हा फोन 6,000mAh battery आणि 6GB RAM सह बाजारात येईल. तसेच Tecno Pova Neo च्या खरेदीवर 1499 रुपयांचे इयरबड्स मोफत देण्यात येतील, असं पोस्टरमध्ये सांगण्यात आलं आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे याचे संपूर्ण स्पेक्स माहित झाले आहेत.  

Tecno Pova Neo चे स्पेक्स  

Tecno Pova Neo स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. हा बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणार ड्युअल सिम फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

टेक्नो पोवा नियोमध्ये 6.8 इंचाचा लार्ज एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या नवीन टेक्नो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.  

पॉवर बॅकअपसाठी नवीन टेक्नो पोवा नियो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही या फोनची खासियत आहे. हा डिवाइस 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 3 तासांपर्यंतचा गेम टाइम देऊ शकतो, असा दावा टेक्नो मोबाईल कंपनीनं केला आहे. हा फोन नायजेरियामध्ये NGN 75,100 अर्थात 13,800 रुपयांमध्ये सादर झाला आहे.  

हे देखील वाचा:  

Samsung युजर्स सावधान! अधिकृत अ‍ॅप स्टोरच करतंय धोकादायक अ‍ॅप्सचा प्रसार; अशाप्रकारे सुरक्षित ठेवा स्मार्टफोन

कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड