शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

108MP कॅमेऱ्यासह आला धमाकेदार Motorola Edge S30 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Updated: December 10, 2021 11:37 IST

5G Phone Motorola Edge S30 launch: Motorola Edge S30 5G Phone चीनमध्ये लाँच झाला आहे. फ्लॅगशिप लेव्हल स्पेक्स आणि मिड रेंज किंमतीसह हा फोन बाजारात आला आहे. यात 108MP Camera, Snapdragon 888+ चिपसेट, 12GB RAM आणि 144Hz रिफ्रेश रेट असे भन्नाट फीचर्स मिळत आहेत.

Motorola नं चीनमध्ये Motorola Edge S30 5G नावाचा नवीन फोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप लेव्हल स्पेसिफिकेशन्ससह जरी आला असला तरी किंमत याची मिड रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. या नव्या मोटोरोला फोनमध्ये कंपनीनं 108MP Camera, Snapdragon 888+ चिपसेट, 12GB RAM आणि 144Hz रिफ्रेश रेट असे भन्नाट फीचर्स दिले आहेत.  

Motorola Edge S30 चे स्पेसिफिकेशन्स 

Motorola Edge S30 मध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. सोबत कंपनीनं 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यांतची स्टोरेज दिली आहे. हा डिवाइस Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. Edge S30 स्मार्टफोन डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि क्वालकॉमच्या लेटेस्ट ब्लूटूथ ऑडियो शेयरिंग टेक्नॉलॉजी (QSS) ला सपोर्ट करतो. 

Motorola Edge S30 5G मध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2460 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR ला सपोर्ट करतो. फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये 16MP चा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Motorola Edge S30 5G Phone ची किंमत 

Motorola Edge S30 5G चे तीन व्हेरिएंट कंपनीनं बाजारात आणले आहेत. या फोनचा 6GB/128GB व्हेरिएंट चीनमध्ये 1,999 युआन (जवळपास 23,700 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 8GB/128GB व्हेरिएंटसाठी 1,999 युआन (जवळपास 26,050 रुपये) आणि 8GB/256GB व्हेरिएंटसाठी 2,399 युआन (जवळपास 28,450 रुपये) द्यावे लागतील. कंपनीनं या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2,399 युआन (जवळपास 30,850 रुपये) ठेवली आहे. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान