शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 34 हजारांत जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; 12GB RAM सह iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच

By सिद्धेश जाधव | Updated: April 14, 2022 12:24 IST

आयकू नियो 6 स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेट, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 64MP Camera आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर झाला आहे.

iQOO ब्रँड दिवसेंदिवस मोठ्या ब्रँड्सना चांगली टक्कर देत आहे. विशेष म्हणजे इतर कंपन्या एकाच फ्लॅगशिप चिपसेटसह दोन स्मार्टफोन वेगवेगळ्या किंमतीत सादर करत नाहीत. कारण त्यामुळे महागड्या फोनला सोडून लोक स्वस्त फोनकडे वळतात. परंतु आयकूनं ती जोखीम iQOO Neo 6 लाँच करून उचलली आहे. कंपनीनं आयकू नियो 6 चीनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 64MP Camera आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर केला आहे. विशेष म्हणजे हाच शक्तिशाली चिपसेट कंपनीच्या महागड्या आयकू 9 प्रो मध्ये देखील मिळतो.  

iQOO Neo 6 चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Neo 6 लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित ओरिजन ओएससह लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. यात 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यांतची UFS 3.1 storage आहे. फोन थंड ठेवण्यासाठी वीसी कूलिंग सिस्टम मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

आयकू नियो 6 मध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे, जो 120हर्ट्ज रिफ्रेश आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे ओआयएस असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाईल फोन 4,700एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.  

iQOO Neo 6 ची किंमत 

आयकू नियो 6 चे तीन व्हेरिएंट्स चीनमध्ये आले आहेत.  

  • 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज:  2799 युआन (सुमारे 33,500 रुपये) 
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज:  2999 युआन (सुमारे 35,900 रुपये)  
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज:  3299 युआन (सुमारे 39,500 रुपये)  

हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही. जर भारतात याचं पदार्पण झालं तर वनप्लस, शाओमी, सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोला देखील चांगली टक्कर मिळेल.  

 
टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड