शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
2
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
3
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
4
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
5
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
6
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
7
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
8
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
9
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
10
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
11
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
12
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
13
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
14
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
15
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
16
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
17
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
18
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
19
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
20
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

‘टेटे’मध्ये भारताने केला क्लीन स्वीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:10 IST

भारतीय पुरुष टेबल टनिस संघाने महिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी नायजेरियाचा ३-० ने पराभव करीत या स्पर्धेत सांघिक विभागात क्लीन स्वीप दिला.

गोल्ड कोस्ट : भारतीय पुरुष टेबल टनिस संघाने महिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी नायजेरियाचा ३-० ने पराभव करीत या स्पर्धेत सांघिक विभागात क्लीन स्वीप दिला.भारतीय महिला संघाने रविवारी सिंगापूरचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते. पुरुष संघाने आज उपांत्य फेरीत सिंगापूरविरुद्ध चुरशीच्या लढतीत ३-२ ने बाजी मारली. राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आल्यानंतर प्रथमच भारताच्या महिला व पुरुष संघांनी सांघिक प्र्रकारात सुवर्णपदकाचा मान मिळवला. टेबल टेनिसमध्ये वैयक्तिक व दुहेरीच्या लढती अद्याप शिल्लक आहेत. अशास्थितीत सांघिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत भारतीय खेळाडूंनी अधिक पदके जिंकण्याची आशा कायम राखली आहे.ग्लास्गो २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला केवळ पुरुष दुहेरीत रौप्यपदक मिळाले होते. ग्लास्गोमध्ये पुरुष सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत नायजेरियाने भारताचा पराभव केला होता. या स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीमुळे देशात टेबल टेनिसचा स्तर उंचावला असल्याचे सिद्ध होते. अव्वल १०० मानांकित खेळाडूंमध्ये भारताच्या सहा पुरुष व दोन महिला खेळाडूंचा समावेश आहे.जागतिक क्रमवारीत ४८ व्या स्थानावर असलेला अजंत शरत कमल देशाचा सर्वोत्तम टेबल टेनिसपटू आहे, यात शंका नाही. तो २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या संघाचा सदस्य होता. आता राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नावावर चार सुवर्णपदकांची नोंद झाली आहे.अंतिम फेरीत पहिल्या लढतीत कमलने नायजेरियाच्या बोडे अबिओदूनविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर ३-१ ने लढत जिंकली. त्याने ४-११, ११-५, ११-४, ११-९ ने विजय मिळवला. युवा साथियान गनासेकरनने पहिला सेट गमावल्यानंतर सेगुन तोरेओलाला ३-१ १०-१२, ११-३, ११-३, ११-४ असे नमविले. त्यानंतर साथियान व हरमित देसाई या भारतीय जोडीने अबिओदून व ओलजिदे ओमोतायो जोडीचा ११-८, ११-५, ११-३ ने पराभव करीत सुवर्णपदक पक्के केले. (वृत्तसंस्था)

भारतीय संघासाठी अंतिम लढत एकतर्फीठरली असली तरी उपांत्य फेरीत मात्र सिंगापूरविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली.अनुभवी गाओ निंगने सिंगापूरसाठी एकेरीमध्ये विक्रमी दोन विजय मिळवले.निंगने देसाई व साथियान यांचा ३-० व ३-१ ने पराभव केला. कमलने एकेरीत शू जिये पांग व शाओ फेंग एथान पोह यांचा ३-० ने पराभव केला. दुहेरीत साथियान व देसाई यांनी पांग-पोह यांचा३-१ ने पराभव करीत भारताला अंतिम फेरीत नेले.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८