शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

वारकऱ्यांच्या दिमतीला यंदा ५७ रुग्णवाहिका

By admin | Updated: June 24, 2014 01:13 IST

जि. प. ची आरोग्य यंत्रणा: इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस घेतेय विठ्ठलभक्तांची काळजी

 सोलापूर:पंढरीत आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पायी चालत येत असतात. त्यांच्या आरोग्याच्या सोयीसाठी आणि अपघात झाल्यास तातडीची सेवा मिळावी यासाठी जि. प. चा आरोग्य विभाग सरसावला आहे. याच उद्देशाने पहिल्यांदाच ५७ रुग्णवाहिका वारी मार्गावर तयार ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय पंढरपुरात १२ ठिकाणी या रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत.आषाढी वारीसाठी येणाऱ्या संत ज्ञानेश्वर व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत तसेच पंढरपुरात ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या ५७ रुग्णवाहिकांद्वारे अद्ययावत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांचा पंढरीत मेळा जमतो. मागील काही वर्षांपासून वारकऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. आषाढीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहू तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरला निघते. पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांची संख्या वाढत जाते. एकादशीदिवशी तर पंढरपूर शहर वारकऱ्यांनी गजबजून जाते. ऐन पावसाळ्याचे दिवस व एकाच वेळी होणारी वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य सेवा तत्परतेने मिळण्यासाठी यावर्षी अधिक दक्षता घेण्यात आली आहे. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत पालखीसोबत विविध ठिकाणी ५७ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. नेमून दिलेल्या ठिकाणी या रुग्णवाहिका थांबणार असून रुग्णवाहिकामध्ये औषधोपचाराची संपूर्ण सुविधांची सोय केली आहे. सोलापूर जिल्ह्यात पालख्यांचा प्रवेश झाल्यानंतर या रुग्णवाहिका नियुक्त ठिकाणी थांबणार आहेत. पंढरपूर शहरात पालख्या आल्यानंतर त्या पंढरपूर शहरातील प्रमुख ठिकाणी थांबणार आहेत.वाळवंटात थांबणार दोन रुग्णवाहिकापालख्या पंढरीत दाखल झाल्यानंतर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या १२ रुग्णवाहिका शहरात विविध ठिकाणी थांबविण्यात येणार आहेत. मार्केट यार्ड (नवीन चंद्रभागा बसस्थानक), पोलीस स्टेशन, सावरकर पुतळा, रेल्वे स्टेशन, गोपाळपूर रोड, नवीन कराड नाका, इसबावी डेअरी, उपजिल्हा रुग्णालय, तीन रस्ता सोलापूर रोड (नदीच्या पलीकडे), सांगोला रोडवर प्रत्येकी एक तर वाळवंटात दोन रुग्णवाहिका थांबविल्या जाणार आहेत. -----------------------सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरांची संख्या पुरेशी आहेच. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातील ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे.- डॉ. सुनील भडकुंबेजिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प.)-----------------------------जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा४ सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा पालख्यांच्या सर्वच मार्गांवर ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गावर ९३ उपचार पथक असून प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक राहणार असल्याचे जि. प. चे जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील भडकुंबे यांनी सांगितले. याशिवाय पालखी मार्गावरील ४० आरोग्य केंद्रांचे ८० वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्या-त्या ठिकाणी सेवा बजावणार आहेत.