पंढरपुरात महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन काम बंद आंदोलन करण्यात आले. राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर, पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नाना वाघमारे, शरद वाघमारे, किशोर खिलारे, जयंत पवार, अनिल गोयल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुर्डूवाडीत हा हल्ला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते.त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई हाच यावरील उपाय आहे. अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख कोमल वावरे, वैशाली मठपती, अतुल शिंदे, तुकाराम पायगण,रवींद्र भांबुरे, प्रवीण देवडकर, कुमार कोळी,जोगदंड, लोखंडे आदी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
मंगळवेढ्यात काळ्या फिती लावून डीवायएसपी राजश्री पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ पवार, नगरसेवक चंद्रकांत पडवळे, सोमनाथ माळी, प्रवीण खवतोडे, बाबासाहेब पवार, दिनेश रजपूत, हरिप्रसाद देवकर, हणमंत गडेकर, रमेश भंडारे, सिद्धेश्वर माळी उपस्थित होते.
अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी येथेही हे आंदोलन छेडून लवकरात लवकर अशा शक्तींचा बिमोड करण्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी, श्रीकांत लाळगे, कामगार संघटनेचे अध्यक्ष खाजप्पा दादानवरू, उपाध्यक्ष नागराज अडाकुल, प्रकाश मनिकडे, भीम भगवान किरगल, निरंजन मुस्के, विठ्ठल पोतेनवरू, दत्ता पोतेनवरू, अमीर मुल्ला उपस्थित होते.
बार्शी हल्लेखोराच्या अटकेची मागणी करीत मंगळवार दिवसभर कामकाज बंद ठेवण्यात आले. एकत्रित येऊन संताप व्यक्त केला. यावेळी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील,भारत विधाते, शिवाजी नाईकनवरे,मीनाक्षी वाकडे, शब्बीर वस्ताद, नितीन शेंडगे, हर्षल पवार,अविनाश शिंदे, मनोज खरात, तुषार खडके, भगवान बोकेफोडे, दत्तात्रय कुलकर्णी, महादेव बोकेफोडे, विनोद जगताप, आप्पासाहेब राऊत, अशोक चिपडे, मनोज खरात, योगेश कारंजकर, सागर नान्नजकर, डॉ. प्रकाश लंकेश्वर, जयपाल वाघमारे आदींसह अधिकारी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.
अकलूज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर पायरीवर बसून काळे झेंडे दाखवत या घटनेचा निषेध केला. संबंधीतावर कठोर कारवाईची मागणी केली. सांगोल्यात काम बंद आंदोलन करीत कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या आंदोलनात लोकप्रतिनिधी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनीदेखील पाठिंबा दर्शवून निषेध नोंदविला. मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी शासनाने पुढाकार घेऊन कारवाईची मागणी केली. मोहोळमध्ये नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी निषेध करत मोहोळचे तहसीलदार राजेशखर निंबारे यांना निवेदन दिले. यावेळी प्रशासकीय अधिकारी सुवर्णा हाके,अमित लोमटे, राजकुमार सपाटे, संगीता कुभार, दिनेश गायकवाड, अलीफ शेख, कोंडिबा देशमुख, महेश भोसले, किशोर स्वामी, गोवर्धन अष्टुळ, संजय वाघमोडे, दिलीप जाधव, राजू शेख सहभागी झाले होते.
-----
नागरिकांची मात्र गैरसोय
- ठाण्याच्या सहायक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने काम बंद आंदोलन छेडले. अन्य शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामुळे कामाच्या निमित्ताने आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र कामकाज बंद ठेवल्याने गैरसोय झाली.