शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेत २० कोटी रूपयाच्या कामांना लवकरच सुरूवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 16:03 IST

जीएसटीचा तिढा आणि शासकीय दरसूचीबाबत मार्गदर्शन न मिळाल्याने जिल्हा परिषदेकडील कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. ही कामे आता मार्गी लागली.

ठळक मुद्दे जिल्हा परिषदेत आगामी दिवसांत विकासकामांचा धडाका कामाच्या ई निविदा लवकरचयंदाच्या वर्षी कर्जमाफीमुळे या निधीत मोठी कपात

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४  : जीएसटीचा तिढा आणि शासकीय दरसूचीबाबत मार्गदर्शन न मिळाल्याने जिल्हा परिषदेकडील कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. ही कामे आता मार्गी लागली असून, आठवडाभरात २० कोटींहून अधिक रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या ई निविदा जारी होत आहेत. उर्वरित विभागांमार्फत करण्यात येणाºया कामांच्याही निविदा लवकरच जारी होत आहेत. एकूणच जिल्हा परिषदेत आगामी दिवसांत विकासकामांचा धडाका लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला विकास निधी देण्यात येतो. यंदाच्या वर्षी कर्जमाफीमुळे या निधीत मोठी कपात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग १ मार्फत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, अक्कलकोट या तालुक्यांसाठी शासनाच्या ३०५४ योजनेतून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कर्जमाफीमुळे यातील २.४० कोटी निधी कपात करण्यात आला. उर्वरित ५ कोटी ६० लाख रुपयांत मागील वर्षीचे ३ कोटी ६६ लाख रुपयांची देणी द्यावी लागतील. चालू वर्षासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. या निधीच्या दीडपट मान्यता घेऊन जवळपास २ कोटी ९५ लाख रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत. याची निविदा जारी होत आहे. बांधकाम विभाग २ च्या माध्यमातून मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा या तालुक्यांसाठी ३०५४ योजनेतून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र यातील ३० टक्के म्हणजेच २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी कर्जमाफीमुळे कमी करण्यात आला. ५ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून ४ कोटी २ लाख रुपयांचे मागील देणे आहे. १ कोटी ५३ लाख निधी शिल्लक आहे. यातून दीडपट कामाची मान्यता घेऊन २ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामाच्या ई निविदा लवकरच जारी होत आहेत.