ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 4 - गावगुंडाने महिलेला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तुळशीराम भोसले असं या गावगुंडाचं नाव असून त्याच पाच जणांच्या मदतीने या महिलेला मारहाण केली. पीडित महिलेच्या डोक्यात काठीने प्रहार करुन तिला जखमी केले. या घटनेत महिलेचा भाऊ आणि मुलगाही जखमी झाला आहे.
बार्शीतील नागोबाच्या वाडीतील ही घटना आहे.
याप्रकरणाची तक्रार घेण्यास बार्शी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोपही महिलेने केला आहे.