शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वर विस्मृतीत

By admin | Updated: December 17, 2014 22:52 IST

पर्यटकांची गैरसोय : किल्ल्यावरील रस्ते, पिण्याच्या पाण्याकडे शासनाचे दुर्लक्ष

संजीव वरे - वाई -अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात परकीयांच्या गुलामगिरीतून रयतेची सुटका करण्याची ज्योत प्रज्वलित झाली अन् मोजक्या मावळ्यांनिशी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली... ते ठिकाण म्हणजे वाई तालुक्यातील रायरेश्वर. ३७० वर्षे उलटून गेलेल्या या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला रायरेश्वर सर्वांच्याच विस्मृतीत गेला आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वाई व भोरमार्गे जाण्यासाठी रस्ते आहेत. शासनाने शिडीचा कडा यापासून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला तर किल्ल्याची चढाई सोपी होईल. पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.रयतेला परकीय आक्रमण, गुलामगिरीतून वाचवायचे असेल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे, हे ओळखून शिवरायांनी २७ एप्रिल १६४५ ला गिरिदुर्ग म्हणजेच रायरेश्वर येथे रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. हे मंदिर पांडवकालीन आहे. गडाचा विस्तार १६ किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासूनची उंची चार हजार मीटर असून, हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. वाई तालुक्याची हद्द गडाच्या पायथ्याला संपते. वाईहून धोम-खावलीमार्गे वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते. मात्र, गडावर पायऱ्या चढूनच जावे लागते. काही संस्थांनी लोखंडी शिड्या लावल्यामुळे गडावर जाणे सोपे झाले आहे.रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माक्याची टेकडी आहे. येथून विलोभनीय विहंगम दृष्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. गडावर सात रंगांची माती आढळते. पश्चिमेला नाखिंदा कडा आहे. गडावर जननी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.रायरेश्वर गडावर जंगम घराण्याची ४५ घरे असून, सुमारे साडेपाचशे लोकवस्ती आहे. गडावर पावसाळ्यात चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही. जनावरे दगावतात. मोठा आर्थिक फटका बसतो. शासनाने गडाची डागडुजी केली, तर पर्यटनस्थळ तयार होईल आणि स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळेल, अशी आशा लोकांना वाटते. येथील मुलांना समाज मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते. वाहनांची सोय नसल्यामुळे माध्यमिक शिक्षणासाठी पाच तास पायपीट करत भोर किंवा वाई येथे जावे लागते. शिडीचा कडा हा एकमेव मार्ग आहे. वाहने गडाच्या पायथ्याला एखाद्या गावात लावावी लागतात. रायरेश्वर मंदिराजवळ गायमुखाचा झरा हाच पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. रस्ता, पाण्याची मोठी समस्या लोकांना भेडसावत आहे. शिवरायांनी जेथे स्वराज्याची शपथ घेतली, तो गड आज सर्वच बाबतीत दुर्लक्षित आहे.चार महिने गडावरच मुक्कामपावसाळ्यात चार महिने गडावरील नागरिकांना सूर्याचे दर्शन होत नाही. मुसळधार पाऊस, वादळी वारा, घनदाट जंगल, श्वापदांचा उपद्रव यामुळे नागरिक गडावरून खाली येत नाहीत. चार महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा अगोदरच करून ठेवला जातो. पावसाळ्यात रुग्णांची ससेहोलपट होते. रस्ता झाला, तर पायथ्याच्या गावांशी संपर्क ठेवता येऊ शकतो.उन्हाळ्यात ग्रामस्थांना शिवकालीन झऱ्यातून पाणी आणावे लागते. त्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पर्यटकांचीही गैरसोय होते. शासनाने गडावर सुविधा द्याव्यात. - गोपाळ जंगम, नागरिक, रायरेश्वररायरेश्वर गडावरील याच रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. हे मंदिर पांडवकाळातील असल्याचे सांगितले जाते.स्थानिकांच्या मागण्याशासनाने कायमस्वरूपी पाणी योजना सुरू करावी.रायरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.गडावर जाण्यासाठी रस्ता तयार करावा.