शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरातच शेतीपंपाची वीज झाली गुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:21 IST

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात घरगुती व लघु उद्योगाचे १२५ वीज कनेक्शन तोडण्यात आले असून रविवारी शेतीपंपाची वीज ...

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात घरगुती व लघु उद्योगाचे १२५ वीज कनेक्शन तोडण्यात आले असून रविवारी शेतीपंपाची वीज तासाभरातच गुल्ल करण्यात आली. तासभरच वीज पुरवठा राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान तालुक्यातील १३६ शेतकऱ्यांनी ५० टक्के रक्कम भरली असल्याचे सांगण्यात आले.

औद्योगिक, घरगुती, शेतीपंप आदींची उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून वीज बिल भरण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने थकबाकीचा आकडा वरचेवर वाढत आहे. थकबाकी भरण्याचे आवाहन करीत शासनाने शेतीपंपाच्या बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. मात्र, घरगुती व शेतीपंपाची थकबाकी भरण्यासाठी ग्राहक शेतकरी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. बिल भरत नसल्याने सुमारे १२५ घरगुती व लघु उद्योगाचे कनेक्शन बंद करण्यात आल्याचे उत्तर सोलापूर तालुका वीज मंडळाचे उपअभियंता संतोष कैरमकोंडा यांनी सांगितले.

शेतीपंपाच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचा फायदा उत्तर सोलापूर तालुक्यातील १३६ शेतकऱ्यांनी घेतला आहे. या शेतकऱ्यांनी ५० टक्क्यांप्रमाणे रक्कम भरल्याने त्यांना तसे प्रमाणापत्रही देण्यात आले आहे. तालुक्यातील १३ हजार शेतकऱ्यांकडे १०४ कोटी चार लाख ८४५ रुपये इतकी थकबाकी असून यापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. ती भरली जात नसल्याने शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर रविवारी एक तासासाठी कार्यान्वित करण्यात आले. तासभर थ्रिफेज वीज पुरवठा सुरू राहिल्याने पिकांना पाणी देता आले नाही. शिवाय ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीचेही पाणी पुरवठा टाकीत पडले नाही. त्यामुळे गावोगावच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

---

शेतकऱ्यांना अजब आवाहन

कारंबा उपकेंद्रांतर्गत १० गावे असून या गावातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. वीज मंडळाची यंत्रणा शेतकऱ्यांना पोहोचली नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी चार हजार रुपये भरावेत, असे आवाहन केले आहे. शासन ५० टक्के वीज बिल भरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन करीत असताना कारंबा उपकेंद्राने चार हजार रुपये भरण्याचे अजब आवाहन केले आहे.