शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आघाडीची सत्ता उद्ध्वस्त करणार

By admin | Updated: July 10, 2014 01:18 IST

रामदास कदम : महायुतीचा निर्धार

सोलापूर : आघाडी सरकारने तीन लाख हजार कोटींचे कर्ज करून सर्वसामान्य जनतेला वेठीला धरण्याचे काम केले आहे. या सरकारला येणाऱ्या विधानसभेत उद्ध्वस्त केल्याशिवाय महायुती स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले. ‘माझा महाराष्ट्र... भगवा महाराष्ट्र’ या कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित वार्तालापाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार शिवशरण पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, धनंजय डिकोळे, माजी नगरसेविका अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, येणाऱ्या विधानसभेत भाजप-सेनेची युती राहणारच असून महायुतीची सत्ता येणार आहे. ‘माझा महाराष्ट्र... भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्यातील २८८ मतदारसंघांत शिवसेना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत, ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. एखाद्या मतदारसंघात शिवसेनेचा १० वेळा पराभव झाला असला तरी तेथे उमेदवार उभा करणार आहोत. कोणी पक्ष सोडत असेल तर सोडू द्या, सेनेला काही फरक पडणार नाही, असेही कदम म्हणाले. महागाईबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले की, याबाबत लवकरच उद्धव ठाकरे खासदारांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी आघाडी सरकारने जे घोटाळे केले आहेत, ते बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांना तुरुंगात टाकले जाईल. महाराष्ट्राला कर्जमुक्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.------------------------बोलबच्चन चालणार नाहीबोलबच्चन करून मते मिळत नसतात. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. कोकण हा शिवसेनेचा भाग असून, येत्या निवडणुकीत नारायण राणेंनासुद्धा पराभूत व्हावे लागणार आहे. उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.