शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपचारास न नेल्याने पत्नीचा मृत्यू ; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

फिर्यादी उमा शंकर चव्हाण (वय ६९, रा. नेहरूनगर, सोलापूर) यांची मुलगी अश्‍विनी हिचा विवाह १४ मे २००५ रोजी लिंगराज ...

फिर्यादी उमा शंकर चव्हाण (वय ६९, रा. नेहरूनगर, सोलापूर) यांची मुलगी अश्‍विनी हिचा विवाह १४ मे २००५ रोजी लिंगराज दामू पवार याच्याबरोबर झाला होता. जावई लिंगराज हे आरोग्य खात्यात नोकरीस होते. मयतास २४ फेब्रुवारी २००६ रोजी मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या कारणावरून जावई लिंगराज हे नाराज असल्याने वारंवार अश्विनीस उपाशी ठेवून मुलगा होण्यासाठी त्रास देऊन मी दुसरे लग्न करणार आहे, तू घटस्फोट दे नाही तर तुला खलास करून टाकीन, अशी दमदाटी करत असे. तद‌्नंतर मंगळवेढ्यातील प्रतिष्ठित लोकांकडून त्यास समज देण्यात आली. त्यामुळे काही दिवस व्यवस्थित नांदवले.

१५ एप्रिल २०२१ रोजी अश्‍विनीस श्‍वास घेता येत नव्हता, तिच्या रक्ताच्या उलट्या झाल्या, तिला उपचारास घेऊन जा, असे फिर्यादीने पाया पडून सांगितले. तरीसुद्धा उपचारास नेले नाही. २२ एप्रिल रोजी अश्‍विनी हिस बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.४० च्या दरम्यान ती मयत झाली. त्यानंतर फिर्यादीचे जावई लिंगराज पवार याने मंगळवेढ्यात येऊन अश्‍विनीच्या दवाखान्याची कागदपत्रे जाळून टाकली व नात श्रध्दा हिस कोणास काही एक सांगू नको म्हणून दमदाटी केली. तुम्ही कोठे तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. मयत अश्‍विनी हिस कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही तिला वेळेत उपचारार्थ दाखल न केल्याने ती मयत झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास शहर बीटचे पोलीस करीत आहेत.