ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची राज्यभर ओळख आहे. दुष्काळी सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजनेची शिरभावी २ लाख ८० हजार ९०६, संगेवाडी २ लाख ६५ हजार ५९५, मेथवडे ७ लाख ८० हजार ५९४, मांजरी २ लाख ३५ हजार ३२९, बामणी १ लाख ६६ हजार ३०८, चिंचोली १ लाख ५४ हजार ५३८, वाकी-शिवणे १ लाख ५० हजार ६२६, महूद ८ लाख २५ हजार ८३३, महिम १ लाख ३३ हजार ५१२, खवासपूर २ लाख ३९ हजार २६९, लोटेवाडी १ लाख ९२ हजार ५१६, अचकदाणी १ लाख ४० हजार १३५, लक्ष्मीनगर ३ लाख २१ हजार २११, नरळेवस्ती २ लाख ८८ हजार ५७७, आलेगाव १ लाख २९ हजार ७७४, वाढेगाव ८ लाख २९ हजार ५१६, आगलावेवाडी १ लाख ५९ हजार ०७, जवळा १ लाख ८९ हजार ४६०, कारंडेवाडी १ लाख ८२ हजार ६१२, भोपसेवाडी १ लाख ४९ हजार ८७८, वझरे २ लाख ३८ हजार ६१३, बलवडी १ लाख ६ हजार ९६२, अजनाळे १ लाख ८५ हजार १८६, अकोला १ लाख ८७ हजार ३५४, कोळा ३ लाख ५६ हजार ७२२, चोपडी १ लाख २४ हजार ५४८, जुजारपूर २ लाख १२ हजार ४९५, हबीसेवाडी १ लाख १२ हजार २७३, राजापूर ९४ हजार ९९२ यासह ६४ गावाकडे ८६ लाख ७४ हजार ३१३ रुपयांची थकबाकी आहे.
शासकीय कार्यालयाकडेही थकबाकी अडकली
ऐन दुष्काळात २०१८ मध्ये शिरभावी योजनेच्या झोनमधून टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु मंगळवेढा, पंढरपूरच्या पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनेची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे ४ लाख २१ हजार २७६ रुपये, पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २०० रुपये आणि सांगोला तहसील कार्यालयाकडे १ लाख २३ हजार ७६ अशी एकूण ५ लाख ८७ हजार ५५२ रुपयांची थकबाकी तर तालुक्यातील एका संस्थेकडे ७ लाख ७२ हजार ३२६ रुपयांची थकबाकी येणे आहे.