शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला तालुक्यातील ८२ गावांवर ओढावणार जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST

सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. ...

सांगोला तालुक्यातील ८२ गावांसाठी आशिया खंडात सर्वात मोठी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना २००२ नंतर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ठेकेदारामार्फत ही योजना चालवली जात आहे. त्यांची मुदत गतवर्षी मार्च २०२० ला संपली होती. त्यामुळे पंचायत समिती सभापती राणी कोळवले यांनी १२ जून २०२० रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच ही योजना पुढे ३ वर्षे चालवावी असा ठराव करून तो त्यांना पाठवून दिला होता. तद‌्नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ही योजना चालवण्यासाठी निविदा काढली असून त्याची मुदत १२ नोव्हेंबर २०२१ ला संपणार आहे. असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १५ जुलैपर्यंतच योजना चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही योजना कोण चालवणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अशातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने १ ते ७ जूनपर्यंत ही योजना बंद ठेवली होती. योजना बंद असल्याची दखल घेऊन आ. शहाजीबापू पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ही योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेच चालवावी अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी योजना चालवण्यासाठी सुरुवात केली असताना अचानक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता मुंबई यांनी १५ जुलैपर्यंत योजना चालवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना कळविले आहे.

जलसंकटाला तोंड द्यावे लागणार

वीज वितरण कंपनीकडून या योजनेच्या वार्षिक ३ कोटी ५० रुपये वीज बिलात ५० टक्के सवलत देऊन १ कोटी ५० लाख रुपये परतावा दिला तरी सुमारे २ कोटी रुपये कोठून उपलब्ध करायचे म्हणून सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ही योजना तोट्यात असल्यामुळे चालविण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे आ. शहाजीबापू पाटील यांनाच आता पाणीपुरवठा मंत्र्याकडे ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने चालवावी की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे चालवायला द्यायची, यासाठी तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा १५ जुलैनंतर सांगोला तालुक्याला जलसंकटाला तोंड द्यावे लागणार, हे मात्र निश्चित.

जीएसटी वगळता ५ कोटी ६० लाखांचा खर्च

शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला ग्रामपंचायतीकडून पाणी मागणीनुसार सुमारे १ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळते. तर सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये वीज बिल, ठेकेदाराकडून ही योजना चालण्यासाठी वर्षाकाठी १ कोटी २० लाख रुपये, तुरटी, टीसीएल पावडर १५ लाख रुपये, पाटबंधारे विभाग २७ लाख रुपये पाणीपट्टीसह इतर असे वर्षाकाठी सुमारे ५ कोटी ६० लाख (जीएसटी) वगळून खर्च येतो. उत्पन्न वजा जाता इतर निधी कोठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य अंधारातच आहे.

फोटो ओळ :::::::::::::::::::

शिरभावीसह ८२ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे संग्रहित छायाचित्र.