शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीत वारकरी करणार भजन आंदोलन! दिंडीसाठी प्लॉट वाटपात अव्यवस्था

By रवींद्र देशमुख | Updated: February 16, 2024 12:21 IST

हे आंदोलन सकाळी 9.30 वा. 65 एकरसमोर केले जाणार आहे. इंगळे महाराज म्हणाले, प्लॉट वाटपाचा खूप त्रास होत आहे.

रवींद्र देशमुख/सोलापूर 

सोलापूर  वारीच्या काळात दिंडीच्या मुक्कामासाठी पंढरपुरातील 65 एकराच्या जागेत जे प्लॉट दिले जातात, त्या प्रक्रियेत वारकऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा निषेध करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ 19 फेब्रुवारी रोजी पंढरीत भजन आंदोलन करणार आहे, अशी माहिती ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली.

हे आंदोलन सकाळी 9.30 वा. 65 एकरसमोर केले जाणार आहे. इंगळे महाराज म्हणाले, प्लॉट वाटपाचा खूप त्रास होत आहे. यासाठी सर्व दिंडी प्रमुखाना 14 फेब्रुवारी रोजी फॉर्म भरण्यासाठी व प्लॉट वाटपसाठी बोलावले होते. पण प्लॉट वाटप केले नाही. सर्व दिंडी प्रमुख आपापली पालखी, दिंडी  सोडून त्यांचेकडे पंढरपुरला आले होते. तिथे कसलीच तयारी नव्हती. साधा एक टेबल सुद्धा नव्हता. दुसऱ्या दिवशी प्लॉट वाटप केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याही दिवशी दुपारपर्यंत कसलीच हालचाल प्रशासन करत नव्हते, असे वातावरण पंढरपूर 65 मध्ये दिसत होते. बहुतेक तेथील अधिकारी हे विरोधी आहेत, असा संशय येत आहे.

कारण हा त्रास प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक वारीला होत आहे. परंतू याची कुणीच दखल घेत नाही. लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन दिले आहे. तरी हा त्रास बंद होत नाही. वारकरी हे संस्कृती, परंपरा सांभाळण्यासाठी दिंडी काढतात. हा त्रास सहन होत नसल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळ आंदोलनाचे पाऊल उचलत आहे, असे महाराज म्हणाले.