शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात वारक-यांचा ट्रक उलटला, 6 जण जखमी

By admin | Updated: June 29, 2017 14:28 IST

माळशिरस कमळमाळा येथे ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे यांच्या दिंडी क्र १३६ रथामागे या दिंडीतील साहित्याने भरलेला ट्रक मुक्कामाच्या ठिकाणी जात उलटल्याने अपघात झाला

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 29 - माळशिरस कमळमाळा येथे ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे यांच्या दिंडी क्र १३६ रथामागे या दिंडीतील साहित्याने भरलेला ट्रक मुक्कामाच्या ठिकाणी जात उलटल्याने अपघात झाला.  यात स्वयंपाक करणाऱ्या महिला व पुरुष , वृद्ध,  १५ते २० भाविक होते. 
 
सुदैवानं या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, 2 किरकोळ तर अन्य 4 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताची बातमी समजताच बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिका-यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. 
 
नातेपुते मुक्कामानंतर सकाळी लवकर ताडपत्री, बांबू, खुंट्या, पाण्याची टाकी, स्वयंपाकाचे साहित्य घेऊन ट्रक माळशिरस येथे आला. त्यात 20 ते 25 लोक बसले होते. या दिंडीचा मुक्काम कमळमळा येथे देवीच्या मंदिराजवळ होता. तिरवंडी रोडणे मंदिराकडे वळताना पुढील ट्रक उलटला. 
 
यावेळी जवळच्या लोकांनी साहित्य बाजूला घेऊन अडकलेल्या महिला व वृद्धांची सुटका केली यातील चार जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अकलुज येथील रूग्णालयात नेण्यात आले. अन्य  भाविकांवर माळशिरस रुग्णालयात उपचार सुरू होते.