शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘वेट ॲन्ड वॉच’ कल्याणराव काळेंची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:21 IST

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होत आहे. २३ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० मार्च ...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी होत आहे. २३ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दिवंगत आ. भारत भालके यांच्या कुटुंबातील व्यक्तीला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असले तरी त्याबाबत अधिकृत घोषणा राष्ट्रवादीकडून केली गेली नाही.

भाजपकडूनही समाधान आवताडे की परिचारक याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीत बंडखोरी करीत शैला गोडसे यांनी जनता हाच आपला पक्ष मानून निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघत असले तरी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या निर्मितीपासून निर्णायक भूमिका बजावणारे सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे मात्र अजूनही ‘वेट ॲन्ड वाॅच’ या भूमिकेत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

कल्याणराव काळे यांना पंढरपूर तालुक्यातील शहर व २२ गावांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. याच मतदारसंघात खर्डी येथे सीताराम साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढ्यातील काही गावांमध्येही त्यांचा संपर्क आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून भारत भालके यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच त्यांनी आमदारकीची हॅट्‌ट्रिक केली होती. त्यांच्या निधनानंतरही विठ्ठल परिवाराच्या पालकत्वाची भूमिका घेत कल्याणराव काळे यांनी परिवार एकसंध ठेवावा, असा कानमंत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर कल्याणराव काळे यांनी विठ्ठलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांना एकत्र ठेवत भगीरथ भालके यांची अध्यक्षपदी नेमणूक करताना विठ्ठल कारखान्यावर उपस्थिती लावली.

मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या पदाधिकारी निवडीचा घोळ अथवा पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी, भाजपकडून उमेदवारीची चाचपणी करताना ते कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

काळे महाविकास आघाडी की भाजपचा रस्ता सुकर करणार

काळे सध्या अधिकृतपणे भाजपचे असले तरी विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून ते दिवंगत आ. भालके यांच्यासोबत कायम होते. गेल्या ग्रा.पं. निवडणुकीतही त्यांनी आपल्या समर्थकांना परिचारक गटासोबत युती न करता विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे उघड आदेश दिले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, काळे विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून पुन्हा महाविकास आघाडीला साथ देणार, की पक्षाचा आदेश मानत भाजपचा रस्ता सुकर करणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

----

याबाबत आपण सध्यातरी थांबा आणि पाहा या भूमिकेत आहोत. पोटनिवडणूक लागली असली तरी पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले नाहीत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण मतदारसंघातील सर्व समर्थकांची स्वतंत्र बैठक घेणार आहोत. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू.

- कल्याणराव काळे, अध्यक्ष, सहकार शिरोमणी कारखाना.