शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षाळ पूजेने गेला विठ्ठल-रुक्मिणीचा शीण

By admin | Updated: July 17, 2014 00:54 IST

विठ्ठल मंदिर: पाच हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

पंढरपूर : आषाढी यात्रेतील देवाचा शिणवटा घालवण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणीला आज प्रक्षाळ पूजा करण्यात आली. पाच हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थित सावळ्या पांडुरंगाचे रुप डोळ्यांत साठवत महाप्रसादाचा लाभ घेतला. गेल्या पंधरा दिवसांपासून आषाढीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भक्तांसाठी २२ तास खुले होते. या काळात विठ्ठलाचे सर्व नित्योपचार बंद ठेवले जातात. तो शीण घालविण्यासाठी प्रक्षाळपूजा केली जाते. त्यानिमित्त आज दुपारी १२.२० वाजता विठ्ठल -रुक्मिणीला गरम पाण्याने स्रान घालण्यात आले. तर सकाळपासून दर्शनाला येणारे भाविक विठ्ठल-रूक्मिणीच्या पायाला लिंबू साखर चोळत होते. दुपारी २.२० वाजता दहिदुधाचा अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महानैवेद्य दाखवला. या संपूर्ण विधीसाठी सकाळी ११.४५ ते दुपारी एक व दुपारी १.४५ ते ४ या दरम्यान दर्शन बंद करण्यात आले होते. प्रक्षाळपूजेनंतर नेहमीप्रमाणे नित्योपचार सुरू करण्यात आले. पश्चिमद्वार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांच्या संकल्पनेतून चातुर्मासाची सुरूवात व प्रक्षाळपूजेनिमित्त पंढरपुरातील विविध महाराज मंडळींना एकत्र बोलावून संतपूजन करण्यात आले.यावेळी ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. गुरू महाराज देगलूरकर, ह.भ.प. चातुर्मासे महाराज, ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. केशव महाराज नामदास, ह.भ.प. अनिलकाका बडवे, ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे, ह.भ.प. एकनाथ महाराज पिंपळनेरकर यांची गंगेच्या व चंद्रभागेच्या पाण्याने पाय धुऊन संतपूजा करण्यात आली.------------------------व्यापारी संघटनेकडून महाप्रसादमंदिरात महापूजा होत असतानाच दुसरीकडे विठ्ठल मंदिराबाहेरील पश्चिमद्वार व्यापारी संघटनेच्या वतीने पंढरपुरातील विविध महाराज मंडळींचे संतपूजन व विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करून प्रक्षाळपूजा करण्यात आली.