नागरिकांकडून विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध देण्याची पंढरपूर शहरातील स्थानिकांची मागणी होत आहे. ही बाब विचारात घेऊन पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना दीपावलीच्या काळात एक दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन उपलब्ध करून दिले होते. तसेच ऑनलाईन बुकिंग पास घेण्याची अट ही एक दिवसासाठी रद्द करण्यात आली होती. यामुळे दिवसभरात ६ हजार नागरिकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ५ डिसेंबरपासून स्थानिक नागरिकांना सकाळी ६ ते ७ या वेळेत विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येत आहे. दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग पासची गरज नाही. यासाठी पंढरपूरचा रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे. तसेच त्यांना कासारघाट येथील दर्शनरांगेतून प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांपुढील व्यक्ती, १० वर्षांखालील मुले, गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्ती यांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
----