शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

विश्व मराठी संमेलन २८ जानेवारीपासून! नऊ अध्यक्षांचे मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:58 IST

संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत

सोलापूर : बृहन्महाराष्ट्र महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या संमेलनासाठी नऊ अध्यक्षांचे मंडळ असून, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असतील.

रविवारी पत्रकार परिषदेमध्ये संमेलनाच्या तारखांची घोषणा करण्यात आली. या संमेलनाद्वारे बारा कोटी मराठी भाषकांना जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच संमेलन असेल, असे संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी सांगितले.

या संमेलनामध्ये जगभरातील ३२ देशांतून, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि १५० हून अधिक संस्था, पाचशेहून अधिक वाचनालये आणि हजारहून अधिक महाविद्यालयांचा सहभाग असेल, तसेच साहित्य, संस्कृती यासोबतच उद्योजकता, लोककलेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत. लीना सोहनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कवी कट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा - कल्पनांचे सादरीकरण, वडीलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा- सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी उपक्रम सादर होतील.

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनसंमेलनामध्ये साहित्य, संस्कृती यासोबतच उद्योजकता, लोककलेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संमेलनात २५ देशांमधून २५ स्वागताध्यक्षही आहेत.  चर्चा, परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कवी कट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा - कल्पनांचे सादरीकरण, वडीलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा- सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी उपक्रम सादर होतील.