शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाविक दर्शनरांगेत अन् कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:26 IST

आषाढी एकादशी सोहळा : मंदिर समितीचे नियोजन कोलमडले

सचिन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक दर्शन रांगेत थांबलेले असताना अतिमहत्वाच्या व्यक्तींबरोबर आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत व्हीआपी दर्शन घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी व्हीआयपी दर्शनासाठी सोळखांबी व चौखांबीमध्ये गर्दी केली़ यामुळे मंदिर समितीने शासकीय महापूजेत बदल करुन वेळ वाचवण्याच्या प्रयत्नावर पाणी पडले. अनेक कार्यकर्त्यांनी विठ्ठलाजवळ फोटो काढत वेळ घालविला़ शेकडो किलो मीटरचे अंतर पार करुन पायी चालत आलेला भाविक विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने दर्शन रांगेत तटकाळत थांबलेले दिसून आले.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी मानाच्या प्रमुख नऊ पालख्या आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपान महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत गजानन महाराज, संत निळोबाराय महाराज यांचा समावेश आहे़ आषाढीसाठी या पालख्यांसह हजारो दिंड्या पंढरपुरात मुक्कामी आहेत.एकादशी सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत थांबतात. ही दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली होती़ दर्शन रांगेतील भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी किमान १६ ते २४ तासाचा कालावधी लागत होता. या १६ तासात भाविक आरोग्य व अन्य समस्यांशी सामना देत दर्शन रांगेतूनच दर्शन घेतात़

दर्शनरांग सुरू होण्यास वेळमंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले व कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी शासकीय महापूजेमध्ये किरकोल बदल करुन कमी वेळत पूजा संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी योग्य कर्तव्य बजावले नाही. यामुळे शासकीय महापूजेदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश केला. यामुळे दर्शन रांग सुरु होण्यास विलंब झाला.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी