अक्कलकोट : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली मुसाफिरी चालवली आहे. राजकारणतरी याला कसे अपवाद ठरणार? अक्कलकोट तालुक्यात ११७ ग्रामपंचायती आहेत. नुकतीच तेथे सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये राखीव व सर्वसाधारण मिळून तब्बल ६२ ग्रामपंचायतींचा गावगाडा हाकण्याची संधी गावकारभारिणींना मिळाली आहे. यामुळे येत्या २०२५ पर्यंत तालुक्यात ‘महिलराज’ असणार आहे.
नुकत्याच ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असल्यातरी सरपंचपदाचे आरक्षण मात्र २०२५ पर्यंत काढले आहे. आरक्षण संपूर्ण ११७ ग्रामपंचायतीचे काढण्यात आले आहे. यामुळे निवडणूक झालेल्या ७२ गावातील लोकांनी प्रशासनावर नाराजी दर्शविले तर ४५ गावातील लोकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
बऱ्याच ग्रामपंचायत आरक्षण जागेसाठी ग्रामस्थांनी हरकती घेतल्या. त्याचे तात्काळ प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी निरसन केले. यंदा ७२ गावचे निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. तर उर्वरित गावचे आरक्षण निवडणूक पूर्वीच का काढण्यात आले असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला गेला. ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये काटावर बहुमत आहे. अशा ठिकाणचे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सहलीला पाठवले आहे. सदस्य फोडाफोडीसाठी घोडेबाजार सुरू झाला आहे.
ही आहेत महिलांसाठी राखीव गावे: अनुसूचित जमाती: अंकलगे, सांगवी खु,ममनाबद, कोळीबेट, कलहिप्परगे.
अनुसूचित जाती:- साफळे, कलप्पावाडी, चिंचोळी(न.), कुमठे, संगोगी(अ), सिन्नूर अरळी.
नामप्र (ओबीसी) संगोगी (ब), उमरगे, कर्जाळ, बॅगेहळळी, मुंढेवाडी, जेऊरवाडी, शिरवळ, बोरगाव, धारसंग, हंद्राळ, नागणसुर, हैद्रा, इब्रामपूर, मराठवाडी, मिरजगी, उडगी.
सर्वसाधारण:- बादोले बु. घुंगरेगावं, सलगर, चिक्केहळळी, सांगवी बु./ कोळेकरवाडी, तळेवाढ, दोड्याळ, सुलतानपूर, शेगाव, दहिटणेवाडी, किरनळळी, चिंचोळी (मैं.), तोळणूर, खैराट, किणी, गुरववाडी, कडबगाव/सेवालालनगर, गौडगाव खु, कोर्सेगाव, नागोरे, नन्हेगाव, गोगाव, वसंतराव नाईकनगर, केगाव खु, भुरीकवटे, मंगरूळ, हंजगी, कलकर्जाळ, कुडल, चप्पळगाववाडी, सदलापूर, हसापूर, बऱ्हाणपूर, तोरणी. अशा तब्बल ६२ गावचे सरपंच आरक्षण महिलांसाठी राखीव झाले आहे. उर्वरीत ३३ ग्रामपंचायतीमध्ये कोणीही सरपंच होऊ शकतात.
----------
कोट
७२ गावांना पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण तर निवडणुका होणाऱ्या गावचे निवडणुकीपूर्वी आरक्षण कसे काय काढण्यात आले. असा सवाल माझ्यासह तालुक्यातील अनेक गावच्या ग्रामस्थांचा आहे. हा निवडणूक झालेल्या गावांवर अन्याय आहे.
-
राजकुमार लकाबशेट्टी माजी सरपंच,बबलाद.
----