शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
3
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
4
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
5
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
6
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
7
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
8
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
9
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
10
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
11
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
12
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
13
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
14
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
15
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
16
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
17
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
18
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
19
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
20
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

‘समीक्षा’ची वाहने जप्त

By admin | Updated: September 3, 2014 00:50 IST

महापालिकेतर्फे ट्रॅक्टरची व्यवस्था

सोलापूर : कर्जाचा हप्ता थकल्याने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीकडे भाड्याने असलेल्या १९ घंटागाड्या बॉम्बे मर्कंटाईल बँकेने सोमवारी सायंकाळी जप्त केल्या. कचऱ्याची समस्या वाढू नये म्हणून महापालिकेने २६ ट्रॅक्टर भाड्याने घेऊन कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. समीक्षा कंपनी शहरातील कचरा उचलण्यात गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आली आहे. कंपनीकडे भाड्याने असलेल्या गाड्यांचा हप्ता भरलेला नाही. विमा संपलेला आहे. अशात कचरा उचलण्यात हयगय केली म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शहरात कचऱ्याचे १२00 स्पॉट आहेत. प्रत्येक स्पॉटला २00 रुपयांप्रमाणे दंड आकारल्याने कंपनीने गेल्या नऊ महिन्यांत बिले सादर न करता उचल घेतली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार रूजू झाल्यावर कंपनीला बिले सादर करण्याबाबत सूचना केली. मुदत देऊनही कंपनीने बिले दिली नाहीत. सभागृहात हा विषय आला. सदस्यांनी कंपनीवर कारवाई करावी, असा ठराव एकमताने मंजूर केला. प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत. कराराचा अभ्यास करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले. दरम्यान, काम सुरू ठेवण्याबाबत समीक्षाची धडपड सुरू आहे. समीक्षाचे प्रोप्रायटर रवींद्र राठोड (रा. शंकरनगर, विंचूर) यांनी बँकेला ३0 लाखांचा धनादेश देऊन इतर वाहने जप्त न करण्याबाबत बॉम्बे मर्कंटाईल बँकेला मुदत मागितली आहे. बँकेला दिलेल्या हमीपत्रात त्यांनी आरिफबेग मिर्जा (रा. मालेगाव), मनसफबेग अहमदबेग यांनी मालेगाव येथील बॉम्बे मर्कंटाईल बँकेकडून कर्ज घेऊन ४0 गाड्या खरेदी करुन समीक्षाकडे भाड्याने दिल्या आहेत. या गाड्यांची जबाबदारी राठोड यांनी घेतली आहे. पण बँकेची पुढील दिशा काय असणार हे समजू शकले नाही. ------------------------------------------आठ मक्तेदारांना कामआरोग्य विभागाने ३१ आॅगस्टला खास आदेश काढून ५८५ प्रति टन कचरा उचलण्याच्या अटीवर ८ मक्तेदारांना काम दिले आहे. अश्रुबा वाघमारे, राजशेखर नवगिरे, वामन जगताप, अमीर पटेल, किरण काटकर यांना काम देऊन २६ ट्रॅक्टर व १0४ बिगाऱ्यांच्या मदतीने कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे.