शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीच्या रस्त्यावरच वाहनांची पार्किंग, ट्रॅफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

करमाळा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला मेन रोड अरुंद आहे. नियमित वर्दळीच्या व रहदारीच्या असलेल्या व्यापार ...

करमाळा शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेला मेन रोड अरुंद आहे. नियमित वर्दळीच्या व रहदारीच्या असलेल्या व्यापार पेठेतील मुख्य रस्त्यावर दुचाकी वाहनधारक व चारचाकी वाहनधारक आपली वाहने थेट रस्त्यावर उभी करून दुकानात खरेदीला जातात. या वाहनामुळे रस्त्यावर नियमित वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा त्रास पायी चालणाऱ्यांना होत आहे.

करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक ते सुभाष चौक, महात्मा गांधी चौक ते फुलसौंदर चौकशिवाय राशीन पेठ, दत्त पेठ व गुजरगल्ली या मार्गावर दवाखाना, मेडिकल, बँक, कापड, इलेक्ट्रिक, सराफ, स्टेशनरीची व्यापार पेठ आहे. या भागात आलेले ग्राहक बँक, दवाखान्यासमोर रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभी करून पार्किंग करत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

---

अरुंद रस्त्यामुळे दिवसभर तीच तीच समस्या

एक तर करमाळा शहरातील मेन रोड व व्यापार पेठेतील रस्ते अरुंद आहेत. त्यात या रस्त्यावर समोरासमोरून आलेली चारचाकी वाहने सहजासहजी जाऊ शकत नाहीत. त्यात ही वाहने थेट रस्त्यावरच पार्किंग करण्यात येत असल्याने, ट्रॅफिक जामच्या समस्येला दिवसभरातून वारंवार सामोरे जावे लागत आहे.

-----

पोलिसांनी मार्ग काढावा

शहरातील या वाहतूककोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस टेंभुर्णी-अहमदनगर बायपास रस्त्यावर मास्क, लायसन्स, डबल व ट्रिपल सीट, जड वाहतूक या वाहनधारकांवरील कारवाईत व्यस्त असतात, पण शहरातील या महत्त्वाच्या समस्येकडे ते लक्ष देत नाहीत. पोलिसांनी ट्रॅफिक जाम समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजय शिलवंत यांनी केली आहे.

----

१५करमाळा-ट्रॅफिक जाम

मेन रोडवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे वारंवार होणारे ट्रॅफिक जाम.