शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

व्हाॅट्‌स‌ अपद्वारे होऊ लागले जनावरे खरेदी-विक्रीचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST

अशा परिस्थितीत शेतकरी, व्यापारी व्हाॅट्‌स‌ अपवर आपल्याकडील गाय, म्हैस, बैल, खोंड यांचे फोटो टाकून त्याखाली किंमत व स्वतःचे ...

अशा परिस्थितीत शेतकरी, व्यापारी व्हाॅट्‌स‌ अपवर आपल्याकडील गाय, म्हैस, बैल, खोंड यांचे फोटो टाकून त्याखाली किंमत व स्वतःचे मोबाईल नंबर टाकून जनावरे खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसाळ्यापूर्वी शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी बैलांसह दुभत्या गाई-म्हशींची खरेदी-विक्री करतात. मागील काळातील दुष्काळी स्थिती, चारा-पाण्याच्या गंभीर प्रश्‍नामुळे जनावरे सांभाळताना कसरत करावी लागत आहे. पशुधनात घट आल्याने अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय मोडीत काढले होते. मात्र अलीकडच्या काळात नैसर्गिक स्थिती चांगली असल्याने शेतकरी पुन्हा दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दुभत्या जनावरांच्या दरात वाढ झाली. मात्र आता पुन्हा गेल्या वर्षभरापासून दूध व्यवसाय अडचणीत आहे.

कोरोना संसर्गाची वाढ होऊ लागल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दुधाला मागणी नसल्याचे सांगत दुधाचे दरही प्रति लिटरमागे सुमारे १० ते १५ रुपयांनी कमी झाले आहेत. याउलट दूध व्यवसाय अडचणीत असलेल्या काळात पशुखाद्याचे दर मात्र वाढले आहेत. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम दुभत्या जनावरांच्या दरावर झाल्याचे दिसत आहे. कोरोना काळात गर्दी होऊ नये म्हणून सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील दर रविवारी भरणारा जनावरांचा आठवडा बाजार बंद ठेवल्याने जनावरांची खरेदी-विक्री बंद आहे.

बाजार सुरू होण्याचे लागले वेध

जनावरांच्या बाजारात मोठ्या संख्येने जर्सी गाय, म्हैस, बैल, खोंड खरेदी-विक्रीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हवे तसे मनाप्रमाणे जनावरांची खरेदी करता येत होती. जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी थेट व्हाॅट्‌स‌ अपच्या माध्यमातून जनावरे खरेदी-विक्रीचा ऑनलाइन व्यवहार सुरू केला आहे. साधारण १ लाख रुपयांपर्यंत मिळणारी दुभती म्हैस आता ७० हजारांपर्यंत विकली जात आहे. ७० ते ८० हजारांपर्यंत विकली जाणारी दुभती गाय ४० ते ४५ हजाराला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना लॉकडाऊन संपून जनावरांंचे बाजार सुरू होण्याचे वेध लागले आहेत.