करमाळा शहरातील नागोबा मंदिर परिसरात राहणारे संतोष क्षीरसागर गेल्या २० वर्षांपासून शहरातील शाळेसमोर वडापाव विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागवत असत, पण गेल्यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रसारामुळे लॉकडाऊन झाल्याने शाळा, बाजारपेठा बंद झाल्या. त्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले. दीड-दोन महिने घरी निवांत बसून राहिल्याने प्रापंचिक समस्या निर्माण होऊ लागल्या, पण आलेल्या संकटावर मात करण्याची जिद्द मनात ठेवून लॉकडाऊन काळात कोणता धंदा आपणास करता येईल याचा विचार करून जीवनावश्यक भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊन काळात प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू विक्रीस दिलेल्या परवानगीच्या संधीचा फायदा घेत ताजी भाजी व फळे शहरात गल्लीबोळातून घरोघरी फिरून विक्री करण्याचे ठरवले. मोटारसायकल व हातगाडा घेऊन भाजी विक्री करू लागलो. घरबसल्या ताजी भाजी मिळत असल्याने ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला व गेली ९-१० महिने या व्यवसायात चांगलाच जम बसला आहे.
फोटो
२२करमाळा स्टोरी
ओळी
हातगाड्यावरून भाजी विक्री करणारे संतोष क्षीरसागर.