सांगोला आगाराचे चालक विठ्ठल भगवान शिंदे व वाहक वसंत कोडिंबा नरळे असे दोघे मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास (एमएच- १४ बीटी- ०६९४) रड्डे- सांगोला मुक्कामी एसटी बस प्रवासी घेऊन सांगोला बसस्थानकाच्या उजव्या गेटमधून आत वळण घेत होते. यावेळी भरधाव वेगाने विनानंबर वाळू भरून भरधाव वेगाने निघालेल्या छोटाहत्तीवरील चालकाने विरुद्ध बाजूने येऊन एसटीला धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. मात्र, धडक दिल्यानंतर छोटाहत्ती भरधाव वेगाने महात्मा फुले चौकाकडे निघून गेला. अपघातानंतर सहकारी एकनाथ बाबर यांनी त्याचा पाठलाग केला; परंतु तो नजर चुकवून पुढे पसार झाला. याबाबत चालक विठ्ठल भगवान शिंदे (रा. वासूद आ.) यांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी टेम्पोचालक, मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
विनाक्रमांक छोटाहत्ती एस.टी. बसला धडक देऊन पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST