शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अक्कलकोटमध्ये तुरीला भाव नसल्याने शेतकऱ्याने उभे पीक जाळले!

By admin | Updated: April 1, 2017 17:38 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : तुरीला भाव नसल्यामुळे १० एकर उभ्या पिकाला आग लावण्याची नामुष्की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या बासलेगावच्या शेतकऱ्यावर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी आपल्या शेतातील १० एकर तुरीच्या पिकाला अक्षरश: आग लावली. काढणीचा खर्च व अडतीचे खर्च याचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय शशिकांत यांनी घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुदैर्वी वेळ शेतकऱ्यांवर आली.शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते आपल्या प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. खरीप पिकामध्ये दरवर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यावषीर्ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरल त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी अडतीला पाठवले. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही.३५०० ते ४२०० पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु शासनाने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी त्याची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागत नाही याची खात्री पटली आणि आपल्या १० एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. प्रयोग म्हणून केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली.गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले आणि बिराजदार यांच्यावर उद्विग्न मनस्थितीतून आपल्याच शेताला आग लावण्याची अगतिकता आली.. अक्कलकोट तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या शासकीय यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्वास उरला नसल्याचे दिसत आहे.