शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

छोटे-बडे हुसेनींची अपूर्व भेट

By admin | Updated: November 5, 2014 15:13 IST

भारतीय चौकात लहान मुलांसह महिलांनी केलेली गर्दी... डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई... आए हुसेना, हुसेना... या हुसेनाचा जयघोष... छोटे आणि बडे हुसेन तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा सर्वांनी टिपला.

सोलापूर : भारतीय चौकात लहान मुलांसह महिलांनी केलेली गर्दी... डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई... आए हुसेना, हुसेना... या हुसेनाचा जयघोष... छोटे आणि बडे हुसेन तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा सर्वांनी टिपला. मोहरमनिमित्त निघालेल्या या मिरवणूक सोहळ्याने वातावरण हर्षाेल्हासित करून सोडले. 
मोहरम कमिटीने या उत्सवाची प्रतिवर्षाप्रमाणे बाराइमाम चौकातून तयारी केली होती. एजाज मुजावर यांच्या कुटुंबाकडून इमाम हुसेनसाहेबांच्या कुटुंबाच्या अहले हरम पंजाची ताबूत काढण्यात आली. तसेच तेलंगी पाच्छा पेठ येथून हेमंत सपार परिवाराकडून राष्ट्रीय एकात्मेचे प्रतीक मानल्या जाणार्‍या पंजाची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी सकाळी ६ वाजता इमामे कासीम नालबंद परिवाराकडून मिरवणूक निघाली. सकाळी ११ वाजता बडे हुसेनी आणि छोटे हुसेनी यांची जिंदाशाह मदार चौकात भेट झाली. त्यानंतर भारतीय चौकात ही भेट झाली. सायंकाळी ४.३0 वाजता ही दोन्ही पंजांची भेट झाली. यावेळी हवेत कबुतरे सोडून तरुणांनी शांतीचा संदेश दिला. तसेच हिरवा रंग उधळून मोहरमचा आनंद व्यक्त केला गेला. 
रात्री १२ वाजता विजापूर वेस येथून हाजीमाही ताबूत-बडे अकबरअली पंजाची भेट झाली. या उत्सवात मोहरम कमिटीचे अध्यक्ष खाजादाऊद नालबंद, जनरल सेकेट्ररी मकबूल मोहोळकर, उपाध्यक्ष हुसेनसाहेब दारुवाले, महिबूब लोकापल्ली, पीरअहमद शेख, शकील मौलवी, गफ्फार गुडमिट्टे, अ.सत्तार सातखेड, हेमंत सपार, इक्बालहुसेन दुर्वेश, इब्राहीम तडकल, सय्यद काझी, अ.रजाक सगरी, अ.मजीद शेख, इक्बाल नदाफ,अत्ताऊल्लाशा मुर्शद, रफियोद्दीन शाब्दी, चाँदसाहेब प्यारे आदी सहभागी झाले होते.
-------------------
थोरला मंगळवेढा तालीम येथील मानाच्या पीर बडा मंगलवेढा सवारीची मिरवणूक मोठय़ा भक्तीभावाने व मंगलमय वातावरणात पार पडली. प्रारंभी कवी बदीऊज्जमा बिराजदार यांनी फातेहखानीचा धार्मिक विधी पूर्ण केला. त्यानंतर संगीतवाद्याच्या निनादात सवारी निघाली. सवारीच्या मिरवणुकीचा समारोप पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या हस्ते करण्यात आला. मोहरमनिमित्त भारतीय चौकात बडे हुसेनी आणि छोटे हुसेनी यांची भेट झाली. या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी तरुण आणि महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. मोहरमच्या दिवशी शहरातून दोनदा मशाल मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. पीर इमाम हुसेन (दुर्वेश पंजा)ची मशालीसह तरुणांनी मंगळवारी पहाटे ४ वाजता मिरवणूक काढली. त्यानंतर सायंक ाळी ७ वाजता तरुणांनी मशाल हाती घेऊन मिरवणूक काढली. पहाटे आणि सायंकाळी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने वातावरण मोहरममय करून सोडले. या मशाल दौडमध्ये हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला. मोहरम कमिटीचे जनरल सेक्रेटरी मकबूल मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक क ाढण्यात आली.