शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७ हजार शौचालयांचे काम पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 11:49 IST

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १ लाख १२ हजार ५७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली.

ठळक मुद्देपाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली माहितीसोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १ लाख १२ हजार ५७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. आणखी ५ हजार १४८ शौचालयांचे काम करणे बाकी असून १५ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात बुधवारी सीईओ डॉ. भारुड यांनी गटविकास अधिकारी आणि विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर डॉ. भारुड म्हणाले की, निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ५ हजार १४८ शौचालयांचे काम होणे बाकी आहे. यासाठी ग्रामसेवकापासून वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वांनी परिश्रम घेतले आहेत. सध्या माढा तालुक्यात २६२३, माळशिरस तालुक्यात ८४०, दक्षिण सोलापूर तालुक्यात ६१४, मोहोळ तालुक्यात १०७१ शौचालयांची कामे होणे बाकी आहे. माढा तालुक्यातील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अपंगसाठी १७०० शौचालये बांधण्यात आली आहेत. -------------------------जिल्हा राज्यात आघाडीवर- शौचालयांचे काम पूर्ण झाल्यानंतर जीओ ट्रॅकिंग सिस्टीमच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटोही अपलोड केले जात आहेत. गटविकास अधिकाºयांकडून कामांचा आढावाही घेतला जात आहे. शौचालय बांधणीच्या कामात जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचेही सीईओ डॉ. भारुड यांनी सांगितले. ----------------------चार तालुक्यातील बीडीओंचा सत्कार - आढावा बैठकीत मंगळवेढा, करमाळा व बार्शी, अक्कलकोट, सांगोला या तालुक्यांतील गटविकास अधिकाºयांनी शौचालयांची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले. मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी आर. आर. जाधव, बार्शीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे, करमाळ्याचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे-पाटील व अक्कलकोटचे गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, प्रकल्प अधिकारी अनिलकुमार नव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंचला पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे आदी उपस्थित होते.