शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू ड्रेनेजची पाईपलाईन जोडताना घडला प्रकार

By admin | Updated: May 7, 2014 20:35 IST

सोलापूर :

सोलापूर : पुणे महामार्गावरील मडकीवस्ती येथे बिल्डरकडून खोदण्यात आलेल्या चारीत ड्रेनेजची पाईपलाईन जोडत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दबून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अमर गणेश डांगे (वय २६, रा. कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) असे मरण पावलेल्या मजुराचे नाव आहे. सिद्धीशांभवी डेव्हलपर्सतर्फे मडकीवस्ती येथे सुरू असलेल्या बांधकामात ड्रेनेजचे काम करण्याचा ठेका सुनील पाटील, विजय चव्हाण यांनी घेतला होता. त्यांनी दहा फुटांची चारी खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी एक वाजता अमर हा चारीत उतरून ड्रेनेज पाईप जोडत होता. यावेळी अचानकपणे बाजूच्या काळ्या मातीचा ढेपारा त्याच्या अंगावर कोसळला. ढिगार्‍याखाली तो दबला गेला. सोबत असलेला मजूर संदीप टिळे याने आरडाओरडा केल्यावर ठेकेदार पाटील, चव्हाण हे तेथे धावत आले. त्यांनी मातीचा ढिगारा बाजूला सारून बेशुद्धावस्थेत अमर याला उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉ. प्रदीप कदम यांनी घोषित केले. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. आईवडिलांना तो एकुलता एक होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.