शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

दुचाकीस्वारास ट्रकने ठोकरले, दोघे जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:21 IST

मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दुचाकीला मागुन धडक देऊन अंगावरुन ट्रक नेल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवरील कुर्डू हद्दीतील दत्त मंदीराजवळ घडली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि ११ : मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दुचाकीला मागुन धडक देऊन अंगावरुन ट्रक नेल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवरील कुर्डू हद्दीतील दत्त मंदीराजवळ घडली.  सुहास भारत चव्हाण (वय ३२ रा.लव्हे), नवनाथ धोंडीबा गोरे (वय ४५ रा.सापटणे भोसे) अशी मयतांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद गौतम सर्जेराव राऊत (वय २८ रा.सापटणे भोसे) यांनी कुर्डूवाडी पोलीसात दिली़    याबाबत माहिती अशी की, कुर्डूवाडी कडून टेंभुर्णीकडे मोटारसायकलवरुन फिर्यादी जात असताना त्याच्या समोरील ट्रक नं.एमएच ४२ टी ९६३० चा चालक मधुकर बबन सुतार (वय ४५ रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे) याने दारुच्या नशेत त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने, अविचाराने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून त्याच्या समोरील मोटारसायकल नं.एमएच ४५ एक्स ०७३६ वरील चालक सुहास भारत चव्हाण वय ३२ रा.लव्हे ता.माढा व पाठीमागे बसलेला नवनाथ धोंडीराम गोरे वय ४५ रा.सापटणे भो ता.माढा यांना पाठीमागुन जोराची धडक देवून त्यांच्या अंगावरुन टकची चाके जावून मार लागुन ते गंभीर जखमी झाले व जागीच मयत झाले.    अपघातामधील मोटारसायकल स्वारांना मरणासन्न अवस्थेत सोडून त्याची पर्वा नकरता, अपघाताची खबर न देता टक चालक तासाच निघून पळून जात असताना फिर्यादीने त्याला थांबविले़ याबाबत फियादी गौतम सर्जेराव राऊत (वय २८ रा.सापटणे भोसे ता.माढा ) यांच्या फिर्यादीवरुन कुर्डूवाडी पोलीसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेदरे हे करीत आहेत.