शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांची रोकड दूधवाल्यानं व्यापाऱ्याला केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

करमाळा : प्रवास करताना परांडा येथील एका व्यापा-याची दोन लाखांची बॅग हरवली. संबंधित व्यापारी राजेश नारायण तालापल्ली यांनी करमाळा ...

करमाळा : प्रवास करताना परांडा येथील एका व्यापा-याची दोन लाखांची बॅग हरवली. संबंधित व्यापारी राजेश नारायण तालापल्ली यांनी करमाळा पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर त्याचा तपास करतानाच करमाळ्यातील फंड गल्लीतील दूधवाले सुनील रामचंद्र मारडकर यांनी पैसे सापडल्याचे सांगितले. व्यापा-यानं खूश होऊन दूधवाल्यास १० हजार रुपये बक्षीस म्हणून दिले.

व्यापारी तालापल्ली यांची रविवार, १९ सप्टेंबर रोजी प्रवास करत असताना दोन लाख रुपये असलेली बॅग हरवली होती. एवढी मोठी रक्कम हरवल्यामुळे ते हवालदिल झाले.

दरम्यान, त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तपास सुरु केला. तपास करत असताना एका दूधवाल्याला ही पैशाची बॅग सापडली असल्याची समोर आले. दूधवाले मारडकर हेही संबंधित व्यक्तीचा शोध घेत होते.

त्यांनी सर्वच्या सर्व रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. राजेश तालापल्ली यांनी दोन लाखांची बॅग हरवल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तेव्हा करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी हवालदार देवकर, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी, सोमनाथ जगताप, गणेश खोटे यांना तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश दिले. याच दरम्यान दूधवाल्याने एवढ्या मोठ्या रकमेची बॅग परत केली. बॅग मिळाल्याने व्यापारी तालापल्ली यांनी दूधवाल्या मारडकर यांना स्वेच्छेने दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.