शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटणे फाट्याजवळ दुचाकी अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

मोहोळ : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर ...

मोहोळ : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. २४) सकाळी ११.३० वाजता मोहोळ तालुक्यात घाटणे गावाजवळ झाला.

मोहोळ पोलिसांच्या माहितीनुसार तायप्पा निवृत्ती साठे (वय ३२) व विशाल पंडित गवळी (वय १६, दोघे रा. मलिकपेठ, ता. मोहोळ) दोघे मोहोळहून मलिकपेठकडे दुचाकीने (क्र. एमएच ४५ एसी १५०५) निघाले होते. घाटणे फाट्याजवळ येताच समोरून आलेल्या मोटारसायकलने (क्र. एमएच १३ बीडी ४३४८) साठे यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली.

या अपघातात दुसऱ्या मोटारसायकलवरील बाबासाहेब सत्यवान चव्हाण (रा. भोयरे, ता. मोहोळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर तायप्पा साठे हे जागीच ठार झाला. साठे यांच्या पाठीमागे बसलेला विशाल गवळी हा गंभीर जखमी झाला असून, शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे.

दोन्ही गावांवर शोककळा

वटपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या अपघातानंतर मलिकपेठ व भोयरे या दोन गावांवर शोककळा पसरली आहे. मलिकपेठचे उपसरपंच गणेश जगताप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. अधिक तपास अपघात पथकाचे पोलीस हवालदार अविनाश शिंदे करत आहेत.

----

२४मोहोळ ॲक्सिडेंट

२४तायप्पा साठे, २४ विशाल गवळी