शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छोटा हत्ती-ट्रकच्या धडकेत दोघे जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST

बार्शी : कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर छोटा हत्ती आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन चालकासह दोघे जण जागीच ठार झाले. या ...

बार्शी : कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर छोटा हत्ती आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन चालकासह दोघे जण जागीच ठार झाले. या अपघातात नऊ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छोटा हत्ती चालक आशिष अजित सातारकर (रा. जामगाव रोड, बार्शी) आणि त्याचा साथीदार गणेश हरी काळे (रा. लातूर) असे जागीच मरण पावलेल्या दोघांची नावे असून, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रोडवर पराग हॉटेलजवळ हा अपघात झाला.

याप्रकरणी पोलिसांनी ट्रक (एम.एच.०६,एच.२६२३)चा चालक आश्रप्पा अच्युत माळी (रा. मुरुड जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रताप नवनाथ जगताप (रा. वांगरवाडी) यांनी रात्री उशिरा फिर्याद दिली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार अपघातातील छोटा हत्ती वाहन हे कुर्डुवाडीहून बार्शीकडे येत होते. इतक्यात लातूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकची जबर धडक बसली. अपघातातील दोन्हीही वाहने रस्त्याच्याकडेला जाऊन कलंडली. छोटा हत्तीची समोरची बाजू पूर्ण चेंदामेंदा झाली. अपघातात चालक व दुसरा सहकारी जागीच मरण पावला.

दरम्यान फिर्यादी प्रताप जगताप हे गावकडे निघाले होते. हा अपघात पाहून त्यांनी तालुका पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोसइ प्रवीण जाधव, पोलीस हवालदार जनार्धन सिरसाट, कॉन्स्टेबल बोदर, विजय घाटे, वैभव भांगे यांचे पथक अपघातस्थळी धावून आले.

---

जखमींवर उपचार

या अपघातात छोटा हत्ती(एम.एच. १४,जी.डी.६४३३)तून निघालेले पूनम पवार, रवी पवार, रंजना रवी पवार, कोमल पवार, नीलम पवार, मनीषा पवार, अमोल बबन पवार, अमोल पवार, अमोल पवार (सर्व रा. सोलापूर रोड, बार्शी) असे नऊ जण जण जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले.

---

फोटो : ०१ बार्शी ॲक्सिडेंट