शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

दोनशे बटूंना अय्याचार, शिवदीक्षा

By admin | Updated: June 10, 2014 00:58 IST

जंगम समाजाचे आयोजन : जगद्गुरूंचे सान्निध्य

सोलापूर : जंगम समाजातर्फे आज येथे दोनशे बटूंना अय्याचार आणि शिवदीक्षा देण्यात आली. यावेळी उज्जयिनी पीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंगस्वामी शिवाचार्य महास्वामीजी, काशी पीठाचे जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले.बृहन्मठ होटगी संस्थानच्या चन्नवीर मंदिरातील ध्यान मंदिरात हा भव्य सोहळा झाला. यावेळी माळकवठा, गौडगाव, मंद्रुप, नागणसूर, मैंदर्गी येथील बटूंना होटगी मठातील शिवाचार्यांनी शिवदीक्षा दिली. वेदमूर्ती शिवयोगी, होळीमठ, वेदमूर्ती बसवराजशास्त्री हिरेमठ, वेदमूर्ती नागनाथशास्त्री यांनी या विधीचे पौरोहित्य केले.यावेळी उज्जयिनी पीठाचे जगद्गुरू महास्वामीजी म्हणाले, सद्गुरूकडून दिलेला मंत्रादेश व्यक्तीचे ऐहिक, पारमार्थिक जीवन सुख, शांती, समाधानी करून देतो. वीरशैवांमध्ये गर्भात असलेल्या मांस पिंडास आठव्या महिन्यात मंत्रोपदेश देऊन लिंगधारणा करतात. याच्या समर्थनात महाभारतातील भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीस सांगितलेली कथा गर्भस्थ अभिमन्यूने कशी ऐकली, चक्रव्यूहातून ज्ञान त्याला कसं झालं, हे महास्वामीजींनी कथन केले. महास्वामीजींनी मोठ्या संख्येने बटूंनी शिवदीक्षा घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, वीरशैव धर्माचे गुरूस्थानी असणाऱ्या जंगमांनी सुसंस्कारी असणं गरजेचे आहे. त्यासाठी अय्याचार विधी हा महत्त्वाचा संस्कार असून, त्यानुसार त्यांनी सदाचरणी राहत समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी होटगी संस्थेचे कार्यकारी संचालक कुंभार, सचिव शांतय्या स्वामी, डॉ. राजशेखर हिरेमठ यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले. राजा कंदलगावकर यांनी आभार मानले. -----------------------देखणा सोहळासोलापूर जिल्ह्यातील बटूंवर धार्मिक संस्कार करण्यासाठी आयोजित केलेला अय्याचार व शिवदीक्षा सोहळा अत्यंत देखणा होता. छोटे बटू शिस्तीत एका रांगेत बसलेले होते. त्यांचे तेजस्वी रूप सर्वांना भारून टाकत होते. जगद्गुरूंच्या साक्षीने झालेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.