शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर बंद’चा प्रयत्न

By admin | Updated: August 2, 2014 00:01 IST

पोलिसांची कडक भूमिका : राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ जण ताब्यात

कोल्हापूर : शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांना येळ्ळूर येथे येण्यास मज्जाव केला. या घटनेच्या निषेथार्थ आज, शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन केले. दुचाकीवरून आवाहन करत जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ‘बंद’चा प्रयत्न अयशस्वी झाला. याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह २७ हून अधिक कार्यकर्त्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली. रावते यांना रोखल्याचे वृत्त समजताच शहरातील शिवसैनिक आमदार क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी एकत्र जमले. येथून आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीवरून कोल्हापूर ‘बंद’चे आवाहन करीत कार्यकर्ते महाद्वार रोड मार्गे पापाची तिकटी येथे येत होते. हा प्रकार समजताच पोलिसांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी कोल्हापूर बंद करू नका, असे आमदार क्षीरसागर यांना सांगितले. क्षीरसागर यांनी कोल्हापूर बंद न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या सर्वांवर कारवाई करून पोलिसांनी सोडून दिले. पोलीस अधीक्षकांची सतर्कतामागील वर्षी शिवसेनेने बेळगावच्या मुद्द्यावर कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली होती. यामुळे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने शिवसैनिक जमा होऊन काही घडण्याच्या अगोदरच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील ‘राडा’ टळला.सरकारी ‘चहापान’ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांचा पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर जबाब घेण्याचे काम सुरू होते. यावेळी नावनोंदणी करेपर्यंत चहा मागविण्यात आला. या चहाचा आमदारांसह सर्व कार्यकर्त्यांनी आस्वाद घेतला. इतरवेळी कडक भूमिका वटविणाऱ्या पोलिसांच्या हातात चहाचा ट्रे बघून उपस्थितांना थोडे आश्चर्यच वाटले. पोलिसांच्या या ‘सरकारी चहापाना’ने कार्यकर्ते चांगलेच सुखावले.नागरिकांचा  उडाला गोंधळ !अचानक शिवसेनेचे कार्यकर्ते दुकान बंद करण्याचे आवाहन करू लागल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक गोंधळून गेले. नेमके काय झाले याची विचारपूस नागरिक पोलिसांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे करत होते. अटक केलेले शिवसैनिक आमदार राजेश क्षीरसागर, शहरप्रमुख शिवाजी जाधव व दुर्गेश लिंग्रस, ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हारूगले, गजानन भुर्के , राजू पाटील, विक्रम पोवार, अजिंक्य गायकवाड, राजू जाधव, अमित चव्हाण, सुधीर काशीद, सुनील भोसले, दीपक चव्हाण, बाळासाहेब पांडव, सागर मूलधरणी, सुजित देशपांडे, रमेश खाडे, धर्माजी सायनेकर, अर्जुन संकपाळ, नीलेश जाधव, सुनील जाधव, ओंकार परमणे, चेतन शिंदे, राजू जाधव, रमेश पोवार, केतन राऊत, आदींना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.