शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

विविध संस्थातर्फे ‘सहकार महर्षीं’ना श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST

शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यातील स.म. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या समाधी स्थळावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते समाधीची ...

शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यातील स.म. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या समाधी स्थळावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते समाधीची पूजा केली. यावेळी विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे समाधीस्थळ ते सहकार महर्षी कारखान्यापर्यंत सहकार महर्षींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ट्रस्टी विठ्ठलराव घोरपडे, लक्ष्मण आसबे, तुकाराम भोईर, चंद्रकांत कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार महर्षी कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष ॲड. प्रकाशराव पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांच्या हस्ते सहकार महर्षींच्या पुर्णाकृती पुतळ्याची पूजा करुन श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी कारखान्याचे संचालक नामदेवराव ठवरे, लक्ष्मण शिंदे, धनंजय चव्हाण, रावसाहेब मगर, राजेंद्र मोहिते, महादेवराव घाडगे, भारत फुले, भीमराव काळे, सतीश शेंडगे, रावसाहेब पराडे, मोहित इनामदार, रामचंद्र ठवरे, अमरसिंह माने-देशमुख यांच्यासह खातेप्रमुख, युनियन प्रतिनिधी व कामगार उपस्थित होते.

अकलुज ग्रामपंचायतीतर्फे स.म. शंकरराव मोहिते-पाटील सिव्हीक सेंटर येथे सहकार महर्षींच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिवतेजसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी माने-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील, ज्योती कुंभार, हेमलता चांडोले, हसीना शेख यांनी अभिवादन केले.

श्री शंकर सहकारी साखर कारखाना येथे उपाध्यक्ष ॲड. मिलींद कुलकर्णी, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ येथे कार्यकारी संचालक रविराज इनामदार-देशमुख, शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट येथे विश्वस्त शिवदास शिंदे, शिक्षण प्रसारक मंडळ येथे सचिव अभिजीत रणवरे, शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बॅंक येथे सरव्यवस्थापक नितीन उघडे, शिवशंकर बझार येथे उपाध्यक्ष अर्जुन भगत, संचालक जगन्नाथ धुमाळ, विजय दोशी, कैलास ताटे, व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख, सुमित्रा सहकारी पतसंस्था येथे सरव्यवस्थापक प्रताप चव्हाण, रणजित दळवी, संजय नवले, दीपक धुमाळ, बाजार समिती येथे सचिव राजेंद्र काकडे, विजयरत्न पशुपक्षी संवर्धन संघ येथे व्यवस्थापक रवींद्र जवळेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन श्रध्दांजली अर्पण केली.