शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट येथे नवीन रुग्णालयात तीन दिवसात कोरोना रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अक्कलकोट-मैंदर्गी रोडवरील स्वामी समर्थ देवस्थानच्या रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोरोना ...

रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अक्कलकोट-मैंदर्गी रोडवरील स्वामी समर्थ देवस्थानच्या रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कोरोना हेल्थ सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्याच दिवशी दिवसभरात पाच रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभरात ५ आणि मंगळवारी ७ असे एकूण १७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण गंभीर स्वरुपाचे असल्याने त्यांना सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित १४ रुग्णांवर स्वामी समर्थ डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरध्ये उपचार सुरू आहेत.

सोमवारी दुपारी आमदार कल्याणशेट्टी यांनी नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल क्षीरसागर यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या. यामुळे रुग्ण व उपचार करणारे वैद्यकीय टीमला आधार मिळाला आहे.

---

नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण येत आहेत. सध्या ऑक्सिजनचे उपचार सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शन लवकरच मिळतील. जास्तीत जास्त रुग्ण याठिकाणी बरे करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

- डॉ.अशोक राठोड, वैद्यकीय अधीक्षक

----

सदरचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागले. यामुळे अनेक गोरगरिबांची सोय होत आहे. सध्या ऑक्सिजनसह अनेक प्रकारचे सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित गरजाही लवकरच उपलब्ध करून देऊ.

- आमदार सचिन कल्याणशेट्टी

----

२६अक्कलकोट-कोविड सेंटर

अक्कलकोट येथील कोरोना रुग्णालयात रुग्णांचे विचारपूस करून अडीअडचणी जाणून घेताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना महिती देताना डॉ. निखिल क्षीरसागर.