शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पाकसमवेत शत्रूराष्ट्राप्रमाणे व्यवहार करा : वर्तक

By admin | Updated: October 22, 2015 21:10 IST

मोदी शासनाला जनतेने मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्तानशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा.

 सोलापूर : मोदी शासनाला जनतेने मोठय़ा अपेक्षेने निवडून दिले आहे. इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्तानशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र असल्याने त्यांच्यासमवेत चाणक्यनीतीनुसार शत्रूराष्ट्राप्रमाणेच व्यवहार करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात अभय वर्तक बोलत होते. ते म्हणाले, भारतापुढे इतिहासातील अफजलखानापासून मोहम्मद घोरीच्या विश्‍वासघाताची उदाहरणे समोर आहेत. भारतातील काही निधर्मी लोकांना पाकिस्तानविषयी विनाकारण प्रेम उफाळून येत आहे. भारतीय चित्रपट, कलाकार यांच्यावर पाकिस्तानात सातत्याने बंदी घातली जात असताना भारतातील वाहिन्यांवर पाकिस्तानी कलाकार निर्धास्तपणे वावरत आहेत. पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत होण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. भारतात सीमेवरील गोळीबार असो, जवानांचे गळे कापून हत्या असो वा आतंकवादाला साहाय्य असो, या सर्व कारवायांत सातत्याने पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपण पाकिस्तानशी शांतता चर्चा करून, पाकिस्तानी खेळाडूंना आणि कलाकारांना भारतात मोकळीक देऊन बलिदान दिलेल्या निरपराध भारतीयांचा अपमान करत आहेत. गेल्या ६७ वर्षांच्या अनुभवातून पाकिस्तानशी कितीही चर्चा करून, गाणी गाऊन वा क्रिकेट खेळून त्यांचे वाकडे शेपूट सरळ झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील लोकांचे कार्यक्रम ठेवणे याचा दुसरा अर्थ ते करीत असलेले सर्व गुन्हे क्षम्य आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक आर्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे शत्रूसमवेत शत्रूप्रमाणेच व्यवहार करणे अपेक्षित आहे. तसेच ज्या कौटिल्याने जगाला राजधर्म शिकवला त्यांच्याकडून आपल्या राज्यकर्त्यांनी शिकले पाहिजे, असेही यावेळी अभय वर्तक म्हणाले. (प्रतिनिधी)