शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

परिवहन कर्मचाऱ्यांचा अचानक बंद !

By admin | Updated: July 2, 2014 00:54 IST

दोन महिन्यांचा पगार थकला : तीन तासांनंतर बस मार्गावर

सोलापूर : दोन महिन्यांचा पगार थकल्याने एसएमटीच्या (सोलापूर महापालिका परिवहन) कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन केल्याने प्रवाशांची दैना झाली. परिवहन व्यवस्थापक व पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तीन तासांनी बसगाड्या मार्गस्थ झाल्या. परिवहन कर्मचाऱ्यांचा मे व जून महिन्याचा पगार थकला आहे. परिवहन खात्याने टप्प्याने पगार देण्याची तयारी केली होती. पण सध्या शाळा सुरू झाल्याने कर्मचारी अडचणीत आले आहेत. मंगळवारी पहाटे कामावर हजर झालेले सर्व कर्मचारी सात रस्ता डेपोसमोर एकत्र आले व त्यांनी पगाराचा निर्णय झाल्याशिवाय गाड्या बाहेर न काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व कर्मचारी प्रवेशद्वारावर बसून राहिले. इकडे सकाळी बस न आल्याने शाळकरी मुले, भाजीपाला विक्रेत्यांची अडचण झाली. परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे, सभापती आनंद मुस्तारे, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी आदींनी तेथे धाव घेतली. महापालिकेकडून ४0 लाख मिळाल्यावर १२ जुलैपर्यंत मे महिन्याचा पगार अदा केला जाईल. लवकरच परिवहनचे बजेट येणार आहे. त्यात मंजुरी मिळाल्यावर जूनचा पगार अदा केला जाईल, असे आश्वासन दिल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तीन तासांनी बस मार्गस्थ झाल्या.परिवहन खात्याच्या ७0 बस धावत असून, दरोज साडेचार लाखांचे उत्पन्न मिळते पण त्या मानाने खर्च पावणेसात लाख आहे. महिन्याकाठी पगाराला ८0 लाख लागतात. जून महिन्यात फेसबूक प्रकरणामुळे झालेल्या आंदोलनात परिवहनचे २५ लाखांचे नुकसान झाले. अशात महापालिकेकडून डिझेल खर्चापोटी मिळालेल्या २२ लाखांपैकी १२ लाखांचा धनादेश वटला नाही. याशिवाय परिवहनची महापालिकेकडे ६६ लाखांची बिले प्रलंबित आहेत.