शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदली अर्जाचा पोर्टल खुलेना, शिक्षक संघाने मागितली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:40 IST

सोलापूर दि २४ : बदली अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली़ मात्र सर्व्हर डाऊन असल्याने पोर्टल काही केल्या ओपन होईना़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : बदली अर्ज भरण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली़ मात्र सर्व्हर डाऊन असल्याने पोर्टल काही केल्या ओपन होईना़ अखेर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि समितीच्या पदाधिकाºयांनी शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची भेट घेऊन आॅनलाईन बदली अर्ज भरण्याला मुदतवाढ मागितली़ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती दिली गेली़ त्याच दिवशी ग्रामविकास मंत्रालयाने २७ फेब्रुवारीच्या जीआरनुसार बदलीपात्र शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरण्याचे फर्मान काढले़ १३ ते २३ सप्टेंबर काळात बदलीचा पोर्टल आॅनलाईन उपलब्ध करुन दिल्याचे जाहीर केले़ पण प्रत्यक्षात या काळात ही सेवा सुरळीपणे मिळालीच नाही़ १३ तारखेनंतर पाच-सहा दिवस मागावयाच्या शाळांची नावेच या पोर्टलवर दिसत नव्हती़ त्यानंतर एक-दोन दिवस ही नावे दिसली़ या काळात काही शिक्षकांनी आॅनलाईन अर्ज भरलाही़ परंतु व्हेरीफाई  करण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही़ त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरुनही न भरल्यासारखे झाले़ तसेच आजपर्यंत पोर्टलही बंदच राहिला़ रविवारी रात्री ९ वाजता व्हॉट्सअ‍ॅपवर सर्व्हर सुरु होत असल्याची पोस्ट पडली आणि बºयाच शिक्षकांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली़ त्यांची झोप उडाली़ परंतु पुन्हा पहिलाच पाढा़ सोमवारी याची मुदत संपणार असल्याने या शिक्षकांच्या पदरी घोर निराशा पडली़ संतप्त शिक्षकांनी शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, शिक्षक समितीचे अध्यक्ष अंकुश काळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्ंिछद्र मोरे, अक्कलकोट संघाचे अध्यक्ष वीरभद्र यादवाड आणि दक्षिण शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे-डोगे यांना घेऊन शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची भेट घेतली आणि आॅनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ मागितली़