शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात वादळाचे तीन बळी

By admin | Updated: May 8, 2014 10:36 IST

सोलापूर जिल्ह्यात वादळाने तिघा जणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर काही भागांमध्ये घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर: जिल्ह्यात या महिन्यात कहरच केला आहे. दररोज कुठे ना कुठे वादळासह पाऊस होत आहे. पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथे नागन्नाथ शिवाजी पांढरे (४६) व पारूबाई गणपत पांढरे (५७) या दोघांचा शेतात काम करत असताना वादळी वार्‍याने तुटलेल्या वीजेच्या तारा अंगावर पडल्याने धक्का बसून जागीच मृत्यू झाला तर बार्शी तालुक्यात घाणेगाव येथे वीज पडून रामलिंग गणपती बचुटे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. सांगोला व मंगळवेढा तालुक्यात घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.सांगोला तालुक्यात बुधवारी दुपारी गौडवाडी-करांडेवाडी येथे वीज कोसळून एक घर आगीच्या भस्मसात पडले. तर डोंगरगाव येथील १५ घरावरील पत्रे उडून पडझड झाली तर जवळ्यातही एका घराची पडझड झाली. रात्री उशीरापर्यंत जिल्‘ातील ग्रामीण भागात अवकळी पाऊस पडत होता.गाौडवाडीअंतर्गत करांडेवाडी येथील संगाप्पा तुकाराम सरगर यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून घरातील संसारपयोगी साहित्य, धान्य, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम जळून भस्मसात झाले. दुपारी घरी कोणी नसल्याने जिवीतहानी टळली. घरनिकी (ता. मंगळवेढा) गावातीलअनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. मधुकर क्षीरसागर यांचे राहते घर जमीनदोस्त झाले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे...नुकसानग्रस्त घराचा पंचनामातहसिलदार श्रीकांत पाटील यांना वादळाची व घर जळाल्याची माहिती मिळताच त्यांनी करांडेवाडी येथे धाव घेतली. सरगर कुटूंबीयाची भेट घेऊन नुकसानीची माहिती घेतली आहे. तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले.