आगलावेवाडी येथील संजय कोळेकर व सुनील आगलावे हे रविवारी शेतात उसाला पाणी देत होते. त्यावेळी काही लोक कोरड्या नदीपात्रातून ट्रॅक्टरमधून वाळू भरताना दिसून आले. ते त्याठिकाणी गेले व वाळू चोरी करणाऱ्यांचे सुनील आगलावे मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत होता. त्यावेळी सुरेश गवंड, अक्षय माळी, चंद्रकांत गवंड, अमोल काळेल या चौघांनी संजय कोळेकर व सुनील आगलावे यास शिव्या देत मोबाइलमध्ये चित्रीकरण का करता व आमच्याविरुद्ध तहसीलदारांना वाळूची माहिती का देता, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी सुरेश गवंड याने त्याच्या हातातील स्क्रूड्रॉयव्हरने संजय कोळेकर याच्या उजव्या दंडावर मारून जखमी केले. याबाबत संजय दत्तात्रय कोळेकर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाळू चोरीची माहिती दिल्यावरून दोघांना मारहाण<bha>;</bha> जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST