शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक ऑक्सिजनमुळे कृत्रिम ऑक्सिजनची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

चिंचणी (ता. पंढरपूर) येथे दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, विश्रामगृह, झेडपी शाळा इमारत, रस्ते आदी ...

चिंचणी (ता. पंढरपूर) येथे दोन कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, विश्रामगृह, झेडपी शाळा इमारत, रस्ते आदी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा माजी मंत्री आ. सुभाष देशमुख व आ. बबनराव शिंदे यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विठ्ठलचे संचालक समाधान काळे, प्रणव परिचारक, उद्योगपती अजित कंडरे, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे, बाळासाहेब कौलगे, पांडुरंग कौलगे, गटविकास अधिकारी सुरेंद्र रणपिसे, बाळासाहेब काळे, सरपंच मुमताज शेख, उपसरपंच रणजित लामकाने, ॲड. पांडुरंग नाईकनवरे, कुलदीप कौलगे, दत्ता बागल, गणेश बागल, सुग्रीव कोळी, दादा साखरे आदी उपस्थित होते.

पंढरपूर पांडुरंगामुळे जागतिक नकाशावर आहे, ही या तालुक्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळे दर्शनाला आलेला माणूस या पर्यावरणपूरक गावात भेटून गेला पाहिजे. त्यादृष्टीने त्याचे मार्केटिंग झाले पाहिजे, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले. या वेळी आ. बबनराव शिंदे यांनी आतापर्यंत तब्बल ७० लाखांचा निधी या गावाला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या. काही कामे प्रगतिपथावर आहेत, याचे समाधान आहे. येथील वाचनालयासाठी ३ कोटी व ट्रेंनिग सेंटर उभारण्यासाठी डीपीडीसीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा आ. बबनराव शिंदे यांनी केली. या वेळी वृक्षमित्र दत्ता बागल यांनी दोनशे सुगंधी झाडे भेट दिली. तर अजित कंडरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट दिल्या. प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले. तर सूत्रसंचालन सावंत यांनी केले.

झाडांचं गाव ते पुस्तकांचं गाव प्रवास

सातारा जिल्ह्यातून कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर विस्थापित झालेलं चिंचणी पंढरपूर तालुक्यातील माळरानावर पुनर्वसित झालं. त्यानंतर या गावातील नागरिकांनी हार न मानता येथे प्रतिमहाबळेश्वर निर्माण करण्याचा चंग बांधला अन‌् लोकसहभागातून तब्बल सात हजार झाडे लावली, ती जगवली. त्यामुळे ‘झाडांचं गाव’ म्हणून चिंचणी जिल्ह्यात परिचित आहे. आता गावात सुसज्ज वाचनालय उभारून सातारा जिल्ह्यातील भिलारप्रमाणे ‘पुस्तकांचं गाव’ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावकऱ्यांच्या या संकल्पनेला सर्व स्तरातून पाठबळ मिळत आहे. देणगीच्या स्वरूपात शेकडो पुस्तकं मिळत आहेत. आ. बबनराव शिंदे यांनीही यासाठी ३ लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे ‘झाडांचं गाव ते पुस्तकांचं गाव’ अशी वेगळी वाटचाल चिंचणीची सुरू आहे.

फोटो :::::::::::::::::::

चिंचणी येथे विकासकामांचे लोकार्पण करताना आ. सुभाष देशमुख, आ. बबनराव शिंदे, मोहन अनपट, समाधान काळे आदी.