शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खोबरे तिकडे नाही बरे!

By admin | Updated: August 5, 2014 23:39 IST

सातारा बाजारपेठ : वर्षभरात दर चौपट,

सातारा : महागाईच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल मे महिन्यापर्यंत साठ रूपये किलो असणारे खोबऱ्याच्या दरात तब्बल चौपट वाढ झाली आहे. बाजारपेठेत खोबऱ्याची आवक कमी असल्याने हे दरवाढ झाली असल्याचा कयास व्यापारी लावत आहेत. साताऱ्याच्या बाजारपेठेत केरळ आणि कर्नाटक या दोन भागांतून मोठ्या प्रमाणावर सुक्या खोबऱ्याची आवक होते. महिन्यातून किमान दोनदा ट्रकद्वारे वाहतुकीने हे खोबरे बाजारपेठेत दाखल होते. पण गेल्या काही दिवसांत धुवाँधार पावसामुळे ट्रक साताऱ्यात येण्यास उशीर होत असल्यामुळे बाजारपेठेत याचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.सुक्या खोबऱ्या प्रमाणेच नारळानेही पंधरा रूपयांचा दर गाठला आहे. याबरोबरचं मसाल्यातील ... या वस्तुंचे दर चांगलेच वाढले आहेत. श्रावण महिन्यात मांसाहार बंद असल्यामुळे खोबऱ्याचा स्वयंपाकघरातील वापर कमी असतो. पण दुसरीकडे शरिराचे तापमान टिकविण्यासाठी आवश्यक असणारे पौष्टिक डिंकाचे लाडु, पावसाळ्यात मुलांना आवडतो तो चिवडा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोबऱ्याचा वापर होतो. रोजच्या स्वयंपकातही लसुण खोबरे यांची गट्टी असते. पण वाढत्या दरामुळे खोबऱ्याचे स्वयंपाकघरातील अस्तित्व मर्यादित झाले आहे. पोहे, उपीट, आंबट वडी, थापी वडी, वडी सजुरी हे काही पदार्थ केल्यानंतर त्याच्यावर सजावटीसाठी वापरण्यात येणारे खोबरे आता नैवेद्यासारखे वापरले जात असल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यात हे दर असेच राहिले तर बिनफोडणीच्या वरणाप्रमाणेच बिनफोडणीची आमटी खाण्याची वेळ सामान्यांवर येणार आहे. पावसाळ्यानंतर दर कमी होण्याचा अंदाज आहे. पण हे दर अगदी दहा वीस रूपयांनी कमी होतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांत सौदा बाजारपेठेत खोबऱ्याबरोबरच सुपारी आणि मेथ्यांचाही भाव वाढला आहे. १८० रूपये किलो दराची सुपारी आता साडे तीनशे रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर चाळीस रूपये किलो दराची मेथी तब्बल ऐंशी रूपयांपर्यंत गेली आहे. बाजारपेठेतील महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.गेल्या काही दिवसांत सौदा बाजारपेठेत खोबऱ्याबरोबरच सुपारी आणि मेथ्यांचाही भाव वाढला आहे. १८० रूपये किलो दराची सुपारी आता साडे तीनशे रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर चाळीस रूपये किलो दराची मेथी तब्बल ऐंशी रूपयांपर्यंत गेली आहे. बाजारपेठेतील महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.